शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

आरसीबीला विजयाचे समाधान

By admin | Updated: May 15, 2017 07:04 IST

अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल.

आकाश नेवे /आॅनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल. कोहलीने दिल्लीच्या चाहत्यांची निराशा केली नाही, कोटलाचे मैदान हे कोहलीचे होमग्राऊंड आहे. त्याने या खेळपट्टीवर आज दमदार खेळी केली. त्याच खेळीच्या बळावर आरसीबीने १६१ धावा केल्या आणि पवन नेगी, हर्षल पटेल यांच्या सुरेख गोलंदाजीने दिल्लीवर विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कोहलीला गवसलेला सूर हे सामन्यात महत्त्वाचे ठरले. त्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तीन षटकार आणि तीन चौकारलगावत केलेल्या या खेळीला विशेष महत्त्व आहे. या सामन्याचा आयपीएल गुणतालिकेवर कोणताही फरक पडणार नसला, तरी चाहत्यांनी विराट कोहलीची खेळी पाहण्याची स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी केली होती. त्यांना पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला विराट बघायला मिळाला. कोहली आणि गेल बाद झाल्यावर आरसीबीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केली. ट्रॅव्हिस हेड आणि केदार जाधव, तर ताळमेळ नसल्यानेच धाव बाद झाले.त्यामुळे आरसीबीची धावसंख्या मर्यादित राहिली. अनुभवी जहीर खान याने कोहलीची खेळी संपुष्टात आणली. दिल्लीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पदार्पण करणाऱ्या आवेश खान याने संजू सॅमसनला बाद केले. मात्र करुण नायर, श्रेयस अय्यर आणि ऋषभपंतने दिल्लीचा डाव सांभाळला. मोहंमद शमी याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना ९ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. आरसीबी गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे. आतापर्यंत स्पर्धेत फक्त तीनसामन्यांत विजय मिळवता आला. मात्र स्पर्धेचा निरोप घेताना किमान अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान आरसीबीला असेल.