शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सपुढे आरसीबीचे आव्हान

By admin | Updated: April 20, 2016 03:25 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात संघर्ष करीत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला उद्या (बुधवारी) दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

मुंबई : आयपीएलच्या नवव्या पर्वात संघर्ष करीत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला उद्या (बुधवारी) दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आॅस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्या अनुपस्थितीत आरसीबी संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत भासत आहे. विंडीजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्री टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीदरम्यान २००८पासून आतापर्यंतच्या लढती रंगतदार झाल्या आहेत. त्यात मुंबईने ९, तर आरसीबीने ८ सामन्यांत सरशी साधली आहे. यंदाच्या मोसमात मुंबई संघाला चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या मोसमातही मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. आरसीबी संघाला गेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. क्विंटन डिकॉकने शतकी खेळी करून दिल्ली संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बँगलोर संघाला गोलंदाजीची बाजू मजबूत करणे आवश्यक आहे. दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या मोसमात गृहमैदानावर खेळताना रायझिंग पुणे सुपरजायंट्स व गुजरात लॉयन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आता मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळविण्यास उत्सुक आहे. कारण, त्यानंतरचे त्यांचे गृहमैदानावर होणारे सामने जयपूरला होतील. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध किरोन पोलार्डला वगळण्याची व पार्थिव पटेलकडून डावाची सुरुवात करण्याची रणनीतीही अपयशी ठरली. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबई संघाची गोलंदाजीची भिस्त न्यूझीलंडचा टीम साउदी व मिशेल मॅक्लनघन यांच्यावर अवलंबून आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला रोखण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू हरभजनसिंग याला सूर गवसण्याची आशा आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पोलार्डला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता आहे. मुंबई संघाला कृणाल पंड्यासारखा उपयुक्त फिरकीपटू लाभला आहे. तो तळाच्या स्थानावर फलंदाजीमध्येही योगदान देण्यास सक्षम आहे. त्याचा भाऊ हार्दिकला अद्याप फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उपयुक्तता सिद्ध करता आलेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता, बँगलोर संघाची ताकद त्यांची फलंदाजी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)> उभय संघ यातून निवडणारमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, जोस बटलर, मिशेल मॅक्लनघन, अंबाती रायुडू, किरोन पोलार्ड, हरभजनसिंग, जगदीश सुचित, टीम साउदी, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, आर. विनयकुमार, कोरी अँडरसन, उन्मुक्त चंद, मर्चंट डि लांग, सिद्धेश लाड, किशोर कामथ, कृणाल पंड्या, दीपक पूनिया, नीतिश राणा, जितेश शर्मा, नत्थू सिंग, अक्षय वखरे, मार्टिन गुप्टिल. रायल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, स्टुअर्ट बिन्नी, इक्बाल अब्दुल्ला, श्रीनाथ अरविंद, केदार जाधव, विक्रमजित मलिक, केन रिचर्डसन, वरुण अ‍ॅरोन, मनदीप सिंग, अबू नेचिम, अ‍ॅडम मिल्ने, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, ट्रेविस हेड, डेव्हिड व्हिसे, सचिन बेबी, लोकेश राहुल, परवेझ रसूल, विकास टोकस, सर्फराझ खान, प्रवीण दुबे, अक्षय कर्णेवार.