शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राणी रामपालची ‘खेलरत्न’साठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:50 IST

हॉकी इंडिया : अर्जुन पुरस्कारासाठी वंदना, मोनिका, हरमनप्रीत यांची नावे

नवी दिल्ली : यशस्वी खेळाडू आणि भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्या नावाची शिफारस हॉकी इंडियाने प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी केली आहे. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी वंदना कटारिया, मोनिका आणि पुरुष हॉकी संघातील आघाडीचा खेळाडू हरमनप्रीत यांची नावे पाठवली.

मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी खेळाडू आर. पी. सिंग आणि तुषार खांडकर यांची नावे पाठविण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सोबतच कोच बी. जे. करियप्पा आणि रमेश पठानिया या दोघांची नावे द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पुढे केली. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च असलेल्या खेलरत्नसाठी १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ यादरम्यानची कामगिरी विचारात घेतली जाईल. राणीच्या नेतृत्वात २०१७ ला महिला संघाने आशिया चषक जिंकला. २०१८ च्या आशियाडमध्ये रौप्य पदक जिंकले तसेच एफआयएच आॅलिम्पिक पात्रता सामन्यात २०१९ ला विजयी गोल नोंदवून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठून दिली.

राणीच्या नेतृत्वात भारतीय संघ एफआयएच रॅकिंगमध्ये नवव्या स्थानी पोहोचला. विश्व अ‍ॅथ्लीट पुरस्कार जिंकणाऱ्या राणीला २०१६ ला अर्जुन आणि २०२० ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०० हून अधिक सामने खेळलेली वंदना, १५० हून अधिक सामने खेळणारी मोनिका तसेच पुरुष हॉकी संघाचा ड्रगफ्लिकर हरमनप्रीत यांची नावे अर्जन पुरस्कारासाठी पाठविण्यात आली. हरमन याने ओडिशा येथे एफआयएच सिरीज आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेत मनप्रीतऐवजी देशाचे नेतृत्व केले होते. हॉकीमध्ये याआधी सरदारसिंग याला खेलरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)