नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची खेळाडू राणी रामपाल भारतीय क्रीडा प्राधिकरणात सहायक प्रशिक्षक बनणार आहे. राणीच्या उत्तम प्रदर्शनाकडे बघून साईने तिच्या नियुक्तीसाठी नियमांत सूट दिली आहे.हरियानाच्या राणीने १५ वर्षांची असताना विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवली होती. त्याआधी राणीने रशियात झालेल्या चॅम्पियन चॅलेंज मालिकेत चार गोल करून भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यासोबतच या स्पर्धेत युवा खेळाडूचा पुरस्कारही मिळवला होता. साईने म्हटले आहे, ‘‘राणी रामपाल ही सध्याची सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या विश्व लीग सेमी फायनल्समध्ये भारतीय संघाच्या प्रदर्शनात महत्त्वाची भूमिका वठवली होती.’’(वृत्तसंस्था)
राणी रामपाल बनणार सहायक प्रशिक्षक
By admin | Updated: August 4, 2015 22:48 IST