बंगळुरू : आॅस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने त्रासाशी झगडल्यानंतर आपल्या झुंजार कामगिरीने भारताला अडचणीत टाकल्याबद्दल आपला ज्युनिअर सहकारी मॅथ्यू रेनशॉ याची प्रशंसा केली. प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या २० वर्षीय रेनशॉ याने पोटातील गडबड आणि चक्कर आल्यानंतरही ६८ आणि ३१ धावांची खेळी केली. त्याला सामन्यादरम्यान उपचारही करून घ्यावा लागला.वॉर्नर म्हणाला, ‘भारतातील पहिला सामना, भारताने याची अपेक्षा केली नव्हती. आम्हीदेखील त्याच्याकडून (रेनशॉ) अशा परिस्थितीत खेळताना पाहिले नव्हते. त्यामुळे तो कसा खेळेल हे आम्हाला माहीत नव्हते आणि ही त्याच्या खेळाविषयी चांगली बाब होती. जेव्हा आपल्या संघात नवीन खेळाडू असतात तेव्हा ते काय करण्यात सक्षम आहेत हे आपल्याला माहीत नसते. तथापि, रेनशॉ सुरेख खेळला. तो पहिल्या डावात मैदानावर टिकला असता, तर वापस आला नसता; परंतु आजारी असल्यानंतरही परिस्थितीशी सामंजस्य ठेवणे आणि परत येणे याचे श्रेय त्याला जाते.’ (वृत्तसंस्था)
वॉर्नरकडून रेनशॉची प्रशंसा
By admin | Updated: March 2, 2017 00:28 IST