शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

राहुल आवारेने पटकावले कांस्य; अमितला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 02:59 IST

आशियाई कुस्ती स्पर्धेत युवा भारतीय मल्लांची चमक

शियान: अमित धनकर याला अंतिम लढतीत एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने बुधवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, राष्टÑकुल स्पर्धेचा विजेता असलेला महाराष्टÑाचा मल्ल राहुल आवारे याने कांस्य पदकावरील आपली पकड निसटू दिली नाही. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी केलेला राहुल आवरे यंदा प्रतिष्ठेचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर’ पुरस्काराचा मानकरीही ठरला होता.२०१३ च्या आशियाई अजिंक्यपद सुवर्ण विजेत्या अमितला ७४ किलो फ्रीस्टाईल अंतिम लढतीत कझाखस्तानचा डेनियार केसानोवा याने ०-५ ने मात दिली. अमितने पात्रता फेरीत इराणचा मोहम्मद असगर नोखोदिलारिकीविरुद्ध २-१ असा विजय मिळवून शानदार सुरुवात केली. उपांत्यपूर्व लढतीत जपानचा युही फुजियामी दुखापतीमुळे बाहेर पडल्याने अमित उपांत्य फेरीत पोहोचला. यावेळी त्याने किर्गिस्तानचा मल्ल इलगिज झाकिपबेकोव याला ५-० ने लोळवले.गोल्डकोस्ट राष्टÑकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेता राहुल आवारेला ६१ किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये कोरियाचा जिनचियोल किमकडून ९-२ ने पराभूत व्हावे लागले. आवारेने पात्रता फेरीत उझबेकिस्तानचा जाहोनगिरमिर्जा तुरोबोवचा तांत्रिक आधारे १०-० ने पराभव केला. उपांत्यपूर्व लढतीत मात्र आवारे इराणच्या ऐशग अहसनपूरकडून पराभूत झाला. अहसनपूरने अंतिम फेरी गाठल्याने आवारेला ‘रेपेचेज’ची संधी मिळाली. ही संधी साधत आवारेने थायलंडचा सिरिपोंग जुमपाकमविरुद्धची लढत १२-१ असा तांत्रिक आधारे जिंकली. (वृत्तसंस्था)बुधवारच्या रौप्य आणि कांस्यसह भारताची पदक संख्या पाच झाली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यचा समावेश आहे. बजरंग पुुनियाने ६५ किलो गटात मंगळवारी सुवर्ण जिंकले तर प्रवीण राणा याने ७९ किलोचे रौप्य तसेच सत्यव्रत कादियानने९७ किलोचे कांस्य जिंकले होते.

टॅग्स :Wrestlingकुस्तीRahul Awareराहुल आवारे