किंग्स्टन : अजिंक्य रहाणेच्या(नाबाद १००) सातव्या शतकी खेळीच्या बळावर भारताने सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत उपहारानंतर पावसाच्या व्यत्ययात १७० षटकांत ८ बाद ४८८ पर्यंत मजल मारली होती.यजमानांचा पहिला डाव १९६ धावांत आटोपला. भारताची एकूण आघाडी २९६ धावांची झाली असून दोन फलंदाज शिल्लक असल्याने या सामन्यावर देखील पकड निर्माण झाली आहे. अजिंक्यने २४ व्या कसोटीत २३१ चेंडूत १३ चौकार व दोन षटकारांच्या सहाय्याने शतक गाठले. चेसच्या चेंडूवर चौकार ठोकूनच त्याने शतकाचा आनंद साजरा केला.
रहाणेचे नाबाद शतक, दुसऱ्या कसोटीवर विंडीजविरुद्ध भारताची पकड
By admin | Updated: August 2, 2016 02:35 IST