शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

संघर्षपूर्ण विजयासह सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:25 PM

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : मिया बिलिचफेल्टवर तीन गेममध्ये मात

जकार्ता : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया बिलिचफेल्टविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत सरशी साधत गुरुवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सिंधूने दुसºया फेरीच्या लढतीत एक तास दोन मिनिटामध्ये बिलिचफेल्टविरुद्ध २१-१४, १७-२१, २१-११ ने सरशी साधली. सिंधूचा जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या बिलिचफेल्टविरुद्ध यंदाचा तिसरा विजय आहे. यापूर्वी तिने डेन्मार्कच्या या खेळाडूचा इंडियन ओपन व सिंगापूर ओपनमध्ये पराभव केला होता. सिंधूची यानंतरची लढत मलेशियाच्या सोनिया चेह व जपानच्या नाओमी ओकुहारा यांच्यादरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूसोबत होईल. सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही आणि बिलिचफेल्टने ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूने पुनरागमन करताना बरोबरी साधली. सिंधूने कामगिरीत सातत्य राखत पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवायला मिळाला. बिलिचफेल्टने दमदार पुनरागमन केले. तिने सुरुवातीला ९-५ आणि त्यानंतर १०-७ ने आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सलग ३ गुण वसूल करीत १०-१० अशी बरोबरी साधली. डेन्मार्कच्या खेळाडूने सिंधूच्या चुकांचा लाभ घेतला आणि दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र सिंधूने वर्चस्व गाजवले व सहज सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, सात्विकासाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीला दुसºया फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजय सुकामुल्जो यांच्याविरुद्ध १५-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton