शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

पंजाबचा सामना डेअरडेव्हिल्सविरुद्ध

By admin | Updated: April 15, 2017 04:39 IST

रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध ९७ धावांनी मोठा विजय नोंदविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध

नवी दिल्ली : रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध ९७ धावांनी मोठा विजय नोंदविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी खेळायचे आहे.कर्णधार जहीर खानच्या नेतृत्वात दिल्लीचा गोलंदाजी मारा भक्कम वाटतो. पण गोलंदाजीत काही उणिवा आहेत. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाब संघाची बलाढ्य बाजू त्यांची फलंदाजी असली तरी केकेआरविरुद्ध काल संघाला आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी अद्याप प्रभावी कामगिरी केली नसल्याने याचा लाभ दिल्ली संघ घेऊ शकतो.दिल्लीची फलंदाजी आतापर्यंत तरी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्याच सभोवताल फिरताना दिसली. सॅमसनने पुण्याविरुद्ध पहिले शतक झळकविले. पंतने आरसीबीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. ख्रिस मॉरिस याने पुण्याविरुद्ध केवळ ९ चेंडूत नाबाद ३८ धावा ठोकून प्रभावी अष्टपैलू खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याने गोलंदाजीत आरसीबी आणि पुण्याविरुद्ध टिच्चून मारा केला होता. सलामीचे आदित्य तारे आणि सॅम बिलिंग्स मात्र अपयशी ठरत आहेत. दोघांनी सुरुवात चांगली केली पण मोठी खेळी करण्यात दोघांना अद्यापही यश आलेले नाही. कोरी अ‍ॅन्डरसनने मात्र निराशा केली. कार्लोस ब्रेथवेट हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे पण त्याने देखील पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत निराश केले. संघाला यशस्वी व्हायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी उंचावायला हवी. याशिवाय फलंदाज करुण नायरची बॅट तळपायला हवी. डेअरडेव्हिल्सच्या गोलंदाजांनी दोन्ही सामन्यात भेदक मारा केला. मॉरिससह कर्णधार जहीर खान आणि पॅट कमिन्स हे प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवित आहेत. लेग स्पिनर अमित मिश्रा पहिल्या लढतीत महागडा ठरल्यानंतर पुण्याविरुद्ध प्रभावी ठरला. फिरकी गोलंदाज शहबाज नदीम याने देखील मोक्याच्या क्षणी बळी घेतले आहेत. मोहम्मद शमी आणि कासिगो रबाडा यांना अद्यापही संधी मिळालेली नाही. पंजाबकडे मनन वोरा आणि हाशिम अमला हे चांगले फलंदाज आहेत. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीवर बरेच काही विसंबून असेल. (वृत्तसंस्था)