शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

पुण्याचा अभिमन्यू बनला ग्रॅण्डमास्टर! पुण्यातील तिसरा, तर महाराष्ट्रातील सातवा बुद्धिबळपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 06:01 IST

बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे.

पुणे : बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे. २५०० एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडत या १७ वर्षीय खेळाडूने सोमवारी रात्री ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म पूर्ण केला.अबूधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभिमन्यूने हा नॉर्म पूर्ण केला. ग्रॅण्डमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील तिसरा, राज्यातील सातवा, तर देशातील ४९वा बुद्धिबळपटू ठरला आहे. ७ ग्रॅण्डमास्टर, एक वूमन ग्रॅण्डमास्टरसह अनेक मातब्बर प्रतिस्पर्ध्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत अभिमन्यूला ३७वे मानांकन होते. या स्पर्धेआधी त्याच्या खात्यावर २४९५ एलो रेटिंग गुण जमा होते. ग्रॅण्डमास्टरच्या किताबासाठी त्याला केवळ ५ गुणांची आवश्यकता होती. ९ फेºयांच्या या स्पर्धेत सातव्या फेरीत इंडिक अलेक्झांडरचे आव्हान अभिमन्यूने साडेपाच तासांच्या लढतीनंतर परतवून लावले. १२७व्या चालीअखेर अलेक्झांडरने पराभव मान्य केला. आठव्या फेरीत ग्रॅण्डमास्टर पी. लुका याला रोखण्यासाठी अभिमन्यूला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, ही लढत बरोबरीत सोडवून त्याने ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक गुणांचा टप्पा ओलांडला. स्पर्धेअखेर त्याचे रेटिंग गुण २५१० इतके झाले आहे. या स्पर्धेत अभिमन्यू ५.५ गुणांसह ११व्या स्थानी राहिला. अभिमन्यू १० वर्र्षांपासून ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून तो सिम्बायोसिसमध्ये १२वी शिक्षण घेत आहे. सरावासाठी वूमन इंटरनॅशनल मास्टर, आकांक्षा हगवणे, चिन्मय कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर समीर काठमाळे, राकेश कुलकर्णी, वूमन ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामिनाथन, अनिरूद्ध देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख अभिमन्यूने आवर्जून केला.राज्यातील सर्वांत तरुण ग्रॅण्डमास्टरअभिमन्यू हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. सध्या त्याचे वय १७ वर्षे, ६ महिने आणि १९ दिवस इतके आहे. या आधी हा विक्रम नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याच्या नावावर होता. २०१३ मध्ये १८ वर्षांचा असताना त्याने हा किताब मिळविला होता. अभिजित कुंटे आणि अक्षयराज कोरे हे पुणेकर अनुक्रमे वयाच्या २३व्या व २४व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनले होते.