शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का

By admin | Updated: February 22, 2016 03:46 IST

जयपूर पिंक पँथर्सला घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जोरदार पाठिंब्याचे कोणतेही दडपण न घेता पुणेरी पलटनने सलग दुसरा विजय मिळवताना यजमानांचा ३३-१८ असा धुव्वा उडवला.

- रोहित नाईक,  जयपूरजयपूर पिंक पँथर्सला घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जोरदार पाठिंब्याचे कोणतेही दडपण न घेता पुणेरी पलटनने सलग दुसरा विजय मिळवताना यजमानांचा ३३-१८ असा धुव्वा उडवला. सुरजितने केलेल्या दमदार पकडी आणि कर्णधार मनजित चिल्लरचा आक्रमक खेळ या जोरावर पुणेकरांनी दमदार विजयाची नोंद करताना गुणतक्त्यात ३२ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली.सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत पुणेकरांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व मिळवले. घरच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि संघमालक अभिषेककडून मिळणारे प्रोत्साहन या जोरावर जयपूर बाजी मारणार, अशी आशा होती. मात्र, पुणेकरांनी शांतपणे खेळ करताना जयपूरला नमवले. मनजित, दीपक हुडा आणि अजय ठाकूर यांनी निर्णायक चढाया करताना जयपूरचे संरक्षण भेदले. तर, दुसऱ्या बाजूला सुरजितने जबरदस्त पकडी करताना यजमानांच्या आक्रमकांवर दबाव आणला.१७व्या मिनिटाला जयपूरवर पहिला लोण चढवल्याचा फायदा घेत मध्यंतराला पुणेकरांनी १६-८ अशी मोठी आघाडी घेतली. यानंतर जयपूर प्रतिकार करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचे सर्वच प्रमुख खेळाडू निष्प्रभ ठरले. जसवीर सिंग आणि राजेश नरवाल यांना आक्रमणात फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच, यजमानांच्या बचावफळीनेही निराशा केली.तत्पूर्वी झालेल्या एकतर्फी सामन्यात तेलगू टायटन्सने दणदणीत विजय मिळवताना बंगळुरू बुल्सचा ४०-२२ असा फडशा पाडला. पहिल्या डावातील आक्रमक खेळ अखेरपर्यंत कायम राखताना तेलगूने सहज बाजी मारली. आक्रमण आणि बचाव यांचा योग्य ताळमेळ साधताना तेलगूने संपूर्ण सामन्यात वर्चस्व मिळवले. राहुल कुमार, मनोज कुमार आणि मिराज शेख यांनी प्रत्येकी एक सुपर टॅकल करताना तेलगूवरील लोणचे संकट तीन वेळा टाळले. त्याच वेळी तेलगूने बंगळुरूवर दोन्ही डावांत एक लोण चढवून दबदबा राखला. मध्यंतरालाच तेलगूने १८-१० अशी आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला. सुकेश हेगडेच्या खोलवर चढाया आणि मिराजचा अष्टपैलू खेळ तेलगूच्या विजयात निर्णायक ठरला.