शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:58 IST

खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात.

- विकास झाडेनवी दिल्ली : कोरोना काळात खेळाडूंचे मनोबळ खचू नये, त्यांना निराशा येऊ नये यासाठी केंद्र सरकारने विशेष उपक्रम सुरु केला आहे. खेळाडूंसाठी विशेष मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात. शिवाय खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ऑलम्पिक आशिया क्रीडा स्पर्धा, राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धा अशा महत्वपूर्ण सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना विशेष आर्थिक निधी प्रदान केला जातो. जे पदक विजेत्या खास खेळाडूंनी वयाच्या ३० व्या वषार्नंतर खेळातून निवृत्त झाले असतील अशा खेळाडूंसाठी १२ ते २० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन दिले जाते. प्रासंगिक आणि विविध खर्चाची पूर्तता करण्यासाठी, निवडलेल्या खेळाडूंना कोअर ग्रुपमध्ये दरमहा ५० हजार रुपये दिले जातात. विकास गटात दरमहा २५ हजार भत्ता दिला जातो.  शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, 'खेलो इंडिया नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' नावाची एक केंद्रीय क्षेत्र योजना चालवते, ज्यामध्ये ग्रामीण आणि स्वदेशी, आदिवासी खेळांना प्रोत्साहन दिले जाते. याकडेही ठाकूर यांनी लक्ष वेधले.क्रीडा कोट्यातून नोकऱ्यांची माहिती केंद्राकडे नाही! क्रीडा कोटा धोरणातंर्गत गुणवंत खेळाडूंसाठी गट आणि पूर्वीचे गट 'घ' मध्ये थेट भरतीच्या रिक्त पदांच्या ५ टक्केपर्यंत आरक्षण प्रदान करते, तथापि, क्रीडा कोटा अंतर्गत प्रदान केलेल्या नोकऱ्यांची आकडेवारी केंद्रीकृत रुपात देखभाल केली जात नाही, अशी माहिती अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली.ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन!ऑलिम्पिक आणि एशियन गेम्स खेलो इंडिया स्कीम आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील ग्रामीण भागातील खेळाडू आणि संघांची प्रतिभा ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, एसएआय प्रशिक्षण केंद्र (एसटीसी), एसटीसीचे विस्तारक केंद्र आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा या योजनेंतर्गत केले जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.