शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार!

By स्वदेश घाणेकर | Updated: October 30, 2018 08:47 IST

आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. याच नकारात्मक वागणुकीमुळेच लढण्याचे बळ दिले आणि आज तो एक उत्तम कबड्डीपटू झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय संघात स्थान मिळवण्याचे आणि सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य  यूपी संघाकडून खेळत असलो तरी महाराष्ट्रा एवढेच प्रेम मिळते, कबड्डीचे चाहते हे सीमावाद मानत नाहीत

आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. त्यांच्या याच नकारात्मक वागणुकीमुळेच मला लढण्याचे बळ दिले आणि आज मी एक उत्तम कबड्डीपटू झालो आहे.. आता तीच माणसं माझे कौतुक करताना थांबत नाहीत, महाराष्ट्रातील कबड्डीपटू श्रीकांत जाधव सांगत होता... प्रो कबड्डी लीगमध्ये तो यूपी योद्धा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रो कबड्डीमधील हे त्याचे चौथे सत्र असले तरी इथपर्यंतची त्याची वाटचाल काटेरी राहिली आहे. हलाखीची परिस्थिती, कबड्डीला घरच्यांचा विरोध, अपयशाचे सत्र, शेजाऱ्यांचे टोमणे या सर्वातून श्रीकांत उभा राहिला. 

अहमदनगरमधील दहिगावणे खेड्यात श्रीकांतचे बालपण.. आई-वडील दोघेही शेतकरी... पंक्चरच्या छोट्याशा दुकानातून वडिलांनी शेतीसाठी जागा घेतली अन्  श्रीकांतसह तीन भावंडांना वाढवले. श्रीकांत घरी मोठा असल्याने त्याने शिकावं आणि एक चांगली नोकरी करावी ही घरच्यांची इच्छा.. पण श्रीकांतला कबड्डीचे वेड.. २०११ साली त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. पण २०१२ मध्ये काही कारणास्तव त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) केंद्र सोडावे लागले. त्यानंतर शेजाऱ्यांचे टोमणे सुरू झाले, घरचेही विरोधातच होते.  "या अशा परिस्थितीमुळे मी कबड्डी खेळणं सोडलं. सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अकादमी जॉईन केली. तेथेही अपयश आले. नियतीने पुन्हा कबड्डी खेळण्याची संधी दिली. विदर्भातील अमरावती संघाचे प्रतिनिधित्व करताना कामगिरीचा आलेख उंचावला. प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पॅंथर संघाने मला घेतले... पण," इतके सांगून श्रीकांत थांबला. त्याला दुखापत झाली आणि प्रो लीगचा हंगाम सोडावा लागला. खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी घरच्यांकडे पैसेही नव्हते. अशावेळी त्याचे मित्र उभे राहिले. त्याच्या यशात मित्रांचा मोलाचा वाटा आहे. त्याने सांगितले," कदाचित मित्र त्यावेळी माझ्यासाठी उभे नसते राहिले, तर एक कबड्डीपटू म्हणून मी तुमच्या समोर दिसलो नसतो. अशोक व रवी गाढे या मित्रांनी मला बरीच आर्थिक मदत केली. दुखापतीमुळे दोन वेळा खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, अशा वेळी हे मित्र उभे राहिले." आज चौथ्या सत्रात खेळताना सर्व कर्ज मिटवून तो घराचा डोलारा समर्थपणे सांभाळत आहे. तो शिकू शकला नाही, परंतु लहान बहीण भावांना शिकवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. "मागच्या दोन सिजनमधून लोकांचे कर्ज फिटवलं. आता परिस्थिती सुधारली आहे. बहीण-भावाच्या शिक्षणाचा खर्च मी करतो. भाऊ 12वीत आहे बहीण स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे... ती चौदावीला आहे. त्यांना खेळात रस नाही, परंतु त्यांना शिकण्याची आवड आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन," असे श्रीकांतने सांगितले.

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी