शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 09:45 IST

हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला

कोरोना व्हायरसनं अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी जग लढा देत आहे. कोरोनामुळे असे अभूतपूर्व संकट येईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण, हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषित केली. तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम आणि नवीन स्वरुप असल्याचे संकेत दिले. मोदींची ही घोषणा म्हणजे अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटनं दिली आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की,  निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील.'' बबिता म्हणाली,''स्वदेशीचा वापर करा आणि देशाला आत्मनिर्भर बनवा. मी स्वदेशी वापरण्याच्या पक्षात आहे, तुम्ही पण आहात का???'' याशिवाय बबितानं पंतप्रधानांच्या घोषणेचं स्वागत केलं. तिनं ट्विट केलं की,'' 20 लाख कोटींचं पॅकेज, आत्मनिर्भर भारत, म्हणून संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवतो. अखेरच्या चेंडूवर षटकार मारला.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBabita Kumari Phogatबबिता फोगाट