शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Grandmaster R Praggnanandhaa : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा इंगा दाखवणाऱ्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi)  बुधवारी भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi)  बुधवारी भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे कौतुक केले. आर. प्रज्ञानंद याने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचा एकतर्फी पराभव केला. सोमवारी सकाळी प्रज्ञानंदने कार्लसनचा विजयी अश्वमेध रोखताना काळ्या मोहऱ्यांसह ३९ व्या चालीअखेर त्याच्यावर मात केली.  पण पहिल्या फेरीच्या १५व्या चरणात प्रज्ञानंदला रशियाच्या व्लादीस्लाव अर्तमीव याने पराभूत केले. या पराभवामुळे प्रज्ञानंदला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारता आली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञानंदचे  कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट केले की,'' युवा प्रतिभावान आर प्रज्ञानंदच्या यशाने आम्हा सर्वांना आनंद झाला. त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा सार्थ अभिमान आहे.  प्रज्ञानंदला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.''  'अनुभवी व प्रतिभावान मॅग्नस कार्लसनला पराभूत करणं... आणि त्यातही काळ्या मोहऱ्यांसह खेळताना वर्ल्ड चॅम्पियनला धूळ चारलं हे खरंच जादुई आहे. प्रग्यानंद, तू भारताचा अभिमान आहेस, असं ट्वीट करत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आर प्रग्यानंदचे कौतुक केलं होतं.

कोण आहे प्रज्ञानंद? 

  • आर प्रज्ञानंदचं पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असं आहे. प्रज्ञानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ साली चेन्नईमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रज्ञानंदने बुद्धिबळ खेळू नये असं त्याच्या वडिलांचं मत होतं. पण त्याची बुद्धिबळातील प्रगती पाहता कुटुंबाने त्याला बालपणापासूनच पाठिंबा दिला.
  • प्रज्ञानंदची मोठी बहिण वैशाली ही देखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. दोन मुलांना बुद्धिबळ शिकवणं शक्य नसल्याने वडिलांचा प्रज्ञानंदच्या बुद्धिबळाला विरोध होता. पण बालपणापासून मोठ्या बहिणीला बुद्धिबळ खेळताना पाहून प्रज्ञानंदलाही बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.
  • प्रज्ञानंदने World Youth Chess Championships Under-8 चे विजेतेपद २०१३ साली पटकावले. त्यामुळे त्याला अवघ्या सातव्या वर्षी फिडे (FIDE) मानांकन मिळाले. २०१५ साली त्याने दहा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले.
  • प्रज्ञानंदने २०१६ साली नवा इतिहास रचला. सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचा मान प्रज्ञानंदने २०१६ मध्ये मिळवला. त्यावेळी त्याचे वय अवघे १० वर्षे १० महिने आणि १९ दिवस इतकेच होतो.
  • प्रज्ञानंद ९०व्या मानांकनासह बुद्धिबळ विश्वचषक २०२१ मध्ये सहभागी झाला होता. चौथ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला Maxime Vachier-Lagrave याने पराभूत केले. प्रज्ञानंदने २०२२ साली Masters विभागातही सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला सव्वा पाच गुणसंख्येसह १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
टॅग्स :Chessबुद्धीबळNarendra Modiनरेंद्र मोदी