शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:44 IST

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. नीरज चोप्रानं भालाफेकीत सुवर्ण जिंकून इतिहास घडवला, तर वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यक्रांती घडवली. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्टपदक जिंकले. ४१ वर्षांनंतर हॉकीत भारतानं ऑलिम्पिक पदक जिंकेल, तर सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला अन् खेळाडूंचे कौतुक केले.

रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!

''नीरज चोप्रासारखे युवक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ४-५ वर्षांच्या अथक मेहनतीमुळे,''असा दावा केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी केला आहे. ( Prime Minister Narendra Modi’s hard work of four to five years was behind youths like Neeraj Chopra getting gold medal in Olympics, Union Minister of State for Communications Devusinh Chauhan said). गुजरात येथील जन आशीर्वाद यात्रेला संबोधित करताना चौहान यांनी हे मत मांडले. ते म्हणाले,''भारतीय महिला खेळाडू पदक जिंकतात किंवा नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत आहेत... या खेळाडूंच्या मागे मोदी साहेब यांची ४-५ वर्षांचे अथक परिश्रम आहेत.''

मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!

टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. (  PM Narendra Modi interaction with Tokyo 2020 Olympic contingent) यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, पुरुष हॉकी संघातील खेळाडू यांच्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी मोदींनी मीराबाई चानूचे कौतुक केले.

ते म्हणाले,''तू पदक जिंकून देशाचं नाव आणखी मोठं केलंस, पण तुझ्या एका कृतीनं मी खूप आनंदी आहे. तू ड्रायव्हर्सचा केलेला सत्कार. पदक जिंकण्याचा अभिमान बाळगणं आणि त्यानंतर आठवणीनं त्यांचा सत्कार करणं, हे आपल्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन आहे. यातून देशातील सर्व लोकांना प्रेरणा मिळेल आणि हेच लोग होते की ज्यांचा तुझ्या यशात वाटा आहे.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राNarendra Modiनरेंद्र मोदीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021