मुंबई : पहिल्याच सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटकडून पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सवर दबाव आहे. दुसरीकडे, जबरदस्त आत्मविश्वासासह कोलकाता नाईट रायडर्स आज मुंबईविरुद्ध त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात ७ गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. केकेआरने गुजरातचा १०गड्यांनी धुव्वा उडवला होता. मुंबर्इ$ि व्यवस्थापनाला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. गेल्या सामन्यात किरोन पोलार्डला शेवटचे षटक फेकावेलागले. ज्यात स्टिव्ह स्मिथने दोन षटकार ठोकले होते. टी-२० क्रिकेटध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा लसिथ मलिंगा टीम साउदीची जागा घेऊ शकतो. तर कृणाल पंड्याच्या जागी अनुभवी हरभजन सिंगला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या इतिहासात खराब सुरुवात झाली आहे. अशाच केकेआरसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्यांना सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करीत लय मिळवावी लागेल. मुंबईचे फलंदाज पुणे संघाविरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या गाठूू शकले नाहीत. कर्णधार रोहित शर्मासह आघाडीचे फलंदाज फिरकीपटू इम्रान ताहिरचा सामना करू शकले नव्हते. त्यामुळे मुंबईला फलंदाजीबाबतही काळजी घ्यावी लागेल. केकेआरकडे बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. त्यांचे फिरकी आक्रमण मजबूूत आहे. संघ असे : कोलकाता नाइट राइडर्स- गौतम गंभीर (कर्णधार) डेरेन ब्राव्हो, ट्रेंट बोल्ट, पीयूष चावला, नाथन कुल्टर नाइल, कोलिन डे ग्रांडहोम, रिषी धवन, सायन घोष, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, ईशांक जग्गी, कुलदीप यादव, क्रिस वोक्स, क्रिस लिन, सुनील नरेन, मनीष पांडे, युसूफ पठाण, अंकित राजपूत, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव. मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, जोस बटलर, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गोथम, एसेला गुणरत्ने, हरभजन सिंग, मिशेल जॉन्सन, कुलवंत के., सिद्धेश लाड, मिशेल मैक्लेगन, लसिथ मलिंगा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, पार्थिव पटेल, कीरोन पोलार्ड, निकोलस पुरान, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लैंडल सिमन्स, टिम साउदी, जगदीशा सुचित, सौरभ तिवारी, विनय कुमार.
मुंबईवर दबाव, केकेआरला विजयाचा विश्वास
By admin | Updated: April 9, 2017 04:00 IST