शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

दबाव भारतावर आहे

By admin | Updated: March 14, 2017 00:52 IST

आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली

रांची : ‘आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली,’ असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा हुकमी फिरकी गोलंदाज नॅथन लिआॅन याने केले.भारत-आॅस्टे्रलिया कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीमध्ये असून आगामी १६ मार्चला रांची येथे होणाऱ्या सामन्यात बाजी मारून निर्णायक आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मालिकेतील अखेरचा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळविण्यात येईल. सोमवारी आॅस्टे्रलिया संघ बंगळुरू येथून रांची येथे रवाना झाला. एका आॅस्टे्रलियन प्रसारमाध्यमाशी बोलताना लिआॅनने म्हटले, ‘‘संघात जबरदस्त आत्मविश्वास भरलेला आहे. भारतात येण्याचे सोडूनच द्या. परंतु, विमान पकडण्यापूर्वी आणि दुबईला पोहोचण्यापूर्वीच अनेक जणांनी आम्हाला गृहीत धरले होते. आम्ही या मालिकेचा चषक जिंकण्यापासून केवळ एक विजयाने दूर आहोत आणि आम्ही हेच साध्य करण्यासाठी येथे आलेलो आहोत.’’ मालिकेत यजमानांवर दबाव असल्याचे सांगताना लिआॅन म्हणाला, ‘‘मालिकेमध्ये दबाव भारतीय संघावर असून आमच्यावर काहीच दबाव नाही. सर्वांनीच आमचा पराभव ४-० असा होईल, असे भाकीत केले होते. आमचा संघ चांगला नाही, ते युवा असून सध्या शिकत आहेत. मात्र, सर्वोत्तम संघांना जगात कुठेही नमवण्याचा विश्वास आम्हाला होता.’’ (वृत्तसंस्था)जखमी असूनही खेळणार...दुसऱ्या कसोटीदरम्यान हाताच्या बोटाच्या चामडीला दुखापत झाली असूनही आॅसीचा अव्वल फिरकीपटू असलेला नॅथन लिआॅनला तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा आहे. ज्या बोटाने आॅफस्पिनर चेंडू वळवतात, लिआॅनच्या त्याच बोटाच्या चामडीला दुखापत झाली आहे. याबाबत लिआॅन म्हणाला, ‘‘या गरमीच्या दिवसांमध्ये मी खूप गोलंदाजी केली आहे आणि वर्षातून असे १-२ वेळा होते. माझ्या बोटाची केवळ चामडी फाटली आहे. काही वेळासाठी खूप वेदना होत होत्या.’’ लिआॅन म्हणाला, ‘‘अशा परिस्थितीमध्ये मी टेप लावून गोलंदाजी करू शकत नव्हतो. कारण, टेप लावून गोलंदाजी न करण्याबाबत नियम आहेत. त्यामुळे याविषयी मी विचारही करीत नव्हतो.’’त्याचबरोबर, ‘‘२०१३ च्या भारत दौऱ्यामध्येही तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मला अशीच दुखापत झाली होती. मात्र तरीही तीन दिवसांनंतर मी खेळण्यात यशस्वी झालो होतो. त्यामुळेच, मला रांची येथील कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी आशा आहे,’’ असेही लिआॅनने म्हटले.