शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणाॅय उपविजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:51 IST

अंतिम लढतीत चीनच्या यांगविरुद्ध पराभव

सिडनी : भारताच्या एच.एस. प्रणाॅय याला रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्याला चीनच्या वेंग होंग यांग याच्याविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.   केरळच्या ३१ वर्षीय प्रणाॅयने पहिली गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. मात्र, निर्णायक गेममध्ये त्याला पाच गुणांच्या आघाडीचा फायदा घेता आला 

नाही आणि जगातील २४ व्या क्रमांकावरील खेळाडू वेंग याच्याकडून ९-२१, २३-२१, २०-२२ असा पराभव झाला.  कोरिया ओपन (२०२२) आणि चीन ओपनचे (२०१९) विजेतेपद पटकावणाऱ्या यांगने या विजयासह मलेशियन मास्टर्सच्या अंतिम लढतीत प्रणाॅयविरुद्धच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. या दोन्ही खेळाडूंमध्ये याआधी केवळ एक सामना झाला होता. प्रणयने त्या सामन्यात तीन गेममध्ये विजय मिळवत मलेशियम मास्टर्सचे विजेतेपद पटकावले होते. प्रणाॅयने या सत्रात आठपैकी सहा सामने सुरुवातीच्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही जिंकले आहेत. त्याने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील अँथोनी गिंटिंग याच्याविरुद्ध पहिली गेम गमावल्यानंतरही विजय मिळवला होता. पहिली गेम गमावल्यानंतर प्रणयकडे निर्णायक गेममध्ये पाच गुणांची १९-१४ अशी आघाडी होती. मात्र, वेंगने शानदार कामगिरी करत विजय साकारला.     

n प्रणाॅयने सामन्यात शानदार सुरुवात करताना ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर वेंगने दबदबा निर्माण करताना १२ गुण मिळवले. प्रणाॅयने चुकीचा फटका मारत पहिली गेम गमावली. दुसऱ्या गेममध्येही तो ०-३ असा पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने ११-८ अशी आघाडी घेतली. n वेंगने येथून पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी साधली. त्यानंतर वेंगने वैद्यकीय विश्रांती घेतल्यानंतर २१-२१ अशी बरोबरी साधली. प्रणाॅयने सलग दोन गुण घेत दुसरी गेम जिंकली. तिसऱ्या गेममध्ये प्रणाॅय १५-९ अशा आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर १९-१९ अशी बरोबरी झाली. प्रणाॅयने विजेतेपदाची संधी निर्माण केली होती. मात्र, वेंगने सलग गुण घेत विजय मिळवला. 

टॅग्स :BadmintonBadminton