शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"अमेरिकेपेक्षा जास्त सुविधा, अजून काय करायचं?"; बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर प्रकाश पदुकोण संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:35 IST

ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण संतापले आहेत.

Prakash Padukone :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान संपले आहे. सोमवारी शटलर लक्ष्य सेनला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध  पराभवाला सामोरे जावे लागले. अशातच भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील खराब कामगिरीनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंवर निशाणा साधत टीका केली आहे. भारतात खेळाडूंना भरपूर सुविधा असून आता खेळाडूंनी पुढे जाण्याची आणि जिंकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात प्रकाश पदुकोण यांनी रोष व्यक्त केला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना खास कामगिरी करता आलेली नाही. १० दिवसांनंतरही भारताच्या खात्यात फक्त तीन कांस्यपदके आहेत, जी नेमबाजीत आली आहेत. भारताला सोमवारी बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती मात्र त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिधूंलाही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशातच भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रकाश पदुकोण यांनी सुनावले आहे. प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील देशातील खेळाडूंच्या फ्लॉप शोवर जोरदार टीका केली आहे. अमेरिकन खेळाडूंनाही ज्या सुविधा मिळत नाही त्या भारतीय खेळाडूंना मिळत असल्याचे प्रकाश पदुकोण म्हणाले.

“आता खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. सध्याचे ऑलिम्पिक आणि मागील ऑलिम्पिक पाहिल्यास, आपण सरकार आणि महासंघाला जबाबदार धरू शकत नाही. त्यांना जे काही करता आले, ते त्यांनी केले. ते फक्त सुविधा देऊ शकतात. पण शेवटी खेळाडूंना कामगिरी करावी लागेल. हे खेळाडू त्याच खेळाडूंना इतर स्पर्धांमध्ये पराभूत करतात पण ऑलिम्पिकमध्ये ते करू शकत नाहीत. खेळाडूंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खेळाडू पुरेशी मेहनत घेत आहेत का, याचा विचार करायला हवा. त्या दिशेने काम करण्याची गरज आहे," असे प्रकाश पदुकोण म्हणाले.

“प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा फिजिओ, कंडिशनिंग ट्रेनर,  न्यूट्रिशनिस्ट  असतो. अजून किती करायला हवं? अमेरिकेसह इतर देशांमध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत असे मला वाटत नाही. मला आशा आहे की खेळाडूंना याची जाणीव होईल की ते जबाबदारी घेतील. त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल नाहीतर महासंघाला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. मात्र, अनेक स्टार खेळाडू असल्याने ते सोपे होणार नाही. त्यांना काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो मुद्दा बनतो. चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमुळे मी खूश नाही. तो (लक्ष्य सेन) पदक जिंकू शकला असता पण इतक्या जवळ आल्यानंतरही तो विजयापासून हुकला," असेही प्रकाश पदुकोण म्हणाले.

दरम्यान, लक्ष्याशिवाय अनेक भारतीय खेळाडूंनी पेरिल ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. लक्ष्य सेनला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जियाविरुद्ध १-१३, १६-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू