वेगाचा सराव करतोय - भुवनेश्वर कुमार

By Admin | Updated: March 5, 2016 03:00 IST2016-03-05T03:00:43+5:302016-03-05T03:00:43+5:30

आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध दोन विकेट घेतल्याने भुवनेश्वर कुमार याचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि भारताच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी संथ चेंडू टाकण्याचा सराव

Practicing Vega - Bhubaneswar Kumar | वेगाचा सराव करतोय - भुवनेश्वर कुमार

वेगाचा सराव करतोय - भुवनेश्वर कुमार

मीरपूर : आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध दोन विकेट घेतल्याने भुवनेश्वर कुमार याचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि भारताच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी संथ चेंडू टाकण्याचा सराव करीत असल्याचे सांगितले.
भुवनेश्वर म्हणाला, ‘‘संघातील पुनरागमनामुळे चांगले वाटत आहे. खरे सांगायचे म्हटल्यास मी गोलंदाजीसाठी आलो तेव्हा नर्व्हस होतो. कारण प्रदीर्घ काळानंतर मी खेळत होतो. मी या संधीची प्रतीक्षा करीत होतो. या कामगिरीने माझा आत्मविश्वास उंचावेल आणि भविष्यात जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी माझ्या आधीच्या सामन्यातील कामगिरीचे स्मरण करेल.’’ तो आपल्या गोलंदाजीत एक नवा पैलू जोडू इच्छितो, असेही या २६ वर्षीय गोलंदाजाने सांगितले.
> आशिया कप टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना गुरुवारी संयुक्त अरब अमिरातला पराभूत केल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली व विशेषत: भुवनेश्वर कुमारची कामगिरी लाजवाब असल्याचे सांगितले. भारताला विजेतेपद मिळवायचे असल्यास त्यांना आपल्या विजयाची लय कायम ठेवावी लागेल आणि रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी करावी लागेल, असेही तो म्हणाला.
- महेंद्रसिंह धोनी

Web Title: Practicing Vega - Bhubaneswar Kumar