शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल - अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 00:54 IST

अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडाविश्वासाठी फारच लाभदायी ठरणार असल्याचा आशावाद ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केला आहे. अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.कोरोना संपल्यानंतर भारतीय खेळांकडे तू कुठल्या दृष्टिकोनातून बघतोस, अशा आशयाचा प्रश्न अभिनवला विचारण्यात आला होता. क्रीडा प्रशासकांसाठी वैकल्पिक कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात यावा, असे सांगून अभिनव पुढे म्हणाला, ‘या कार्यक्रमामुळे खेळाडूृंसाठी दीर्घकालिन योजना अमलात येऊ शकतील. खेळात करिअर बनवू इच्छिणारे अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यासाठी पुढे काय, असा सवाल उपस्थित झाल्यास अशा खेळाडूंना पर्याय म्हणून करिअरच्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी मिळू शकतात.’खेळाडू म्हणून स्वत:च्या अनुभवातील अनेक बाबींचा उलगडा करीत अभिनवने प्रतिभाशोध आणि विकास कार्यक्रमाला बळ देण्याचे आवाहन केले. खेलो इंडियातून उदयास आलेल्या खेळाडूंमध्ये एक टक्का उणीव राहू नये, यादृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे मत त्याने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)‘कोरोनानंतर भारताच्या क्रीडाक्षेत्रासाठी वातावरण पूरक ठरणार आहे. अनेक विदेशी स्पर्धा आणि सराव शिबिरे होणार नसल्याने उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याची भारताकडे संधी असेल. आम्हाला स्वत:चे कोचेस आणि सहयोगी स्टाफ तयार करण्याची गरज आहे.’