टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं पटकावून दिलं. २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu) ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. टोक्यो ऑलिम्पिकमधील सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ( PM Narendra Modi interaction with Tokyo 2020 Olympic contingent) यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, पुरुष हॉकी संघातील खेळाडू यांच्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी मोदींनी मीराबाई चानूचे कौतुक केले.
Video : मीराबाई चानूच्या 'त्या' कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले, हेच संस्कार महत्त्वाचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 10:35 IST