शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

यू मुंबाचा कर्णधार म्हणतो, 'कधी कधी हरलंही पाहिजे!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:37 IST

मुंबई : यू मुंबा तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : यू मुंबा तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. शुक्रवारपासून पटना पायटेट्स विरुद्ध दबंग दिल्ली या सामन्याने प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या सत्रात मुंबईतील सामन्यांना सुरुवात होईल. या सामन्यानंतर यजमान यू मुंबा बंगळुरु बुल्सला भिडेल. यू मुंबाने सलग चार सामने जिंकत मुंबईत प्रवेश केल्याने चाहत्यांना संघाने हीच कामगिरी कायम राखण्याची इच्छा आहे. मात्र, यू मुंबाचा कर्णधार सुरिंदर सिंगने, 'कधी कधी पराभव होणेही चांगले ठरते,' असे म्हणत सर्वांना गोंधळून टाकले.

घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील पहिला सामना खेळण्याआधी यू मुंबाचा कर्णधार सुरिंदर याने 'लोकमत'शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ' खेळामध्ये हार-जीत होत असते आणि कधी कधी पराभवही झाला पाहिजे, कारण दमदार पुनरागमनासाठी हा पराभव महत्त्वाचा ठरतो. पराभवानंतर आपण आपल्या चुकांकडे जास्त लक्ष देतो. जिंकल्यानंतर आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. पराभवातूनच प्रत्येक व्यक्ती यशस्वी कामगिरी करत असते, त्यामुळे पराभवही झाला पाहिजे. आपल्या चुकांचे विश्लेषण करुन त्यात सुधारणा करुन पुनरागमन करण्याचा प्रयत्न करायचा असतो. सामन्यात प्रत्येक खेळाडू सराव करुन उतरलेला असतो आणि पराभवासाठी एक क्षण कारणीभूत ठरतो. त्या क्षणी आपण कुठे चुकलो, कोणती चाल चुकीची केली किंवा समोरच्या संघाने कोणती रणनिती चांगली आखली, याचे विश्लेषण करता आले पाहिजे.'

घरच्या मैदानावर मोठ्या कालावधीनंतर खेळणार असल्याने यासाठी उत्सुक असल्याचेही सुरिंदर म्हणाला. त्याने म्हटले की, 'चार वर्षांनी घरच्या मैदानावर खेळणार असल्याने कोणतेही दडपण नाही. संघात उत्साहाचे वातावरण असून सर्वांनाच घरच्या मैदानावर खेळण्याची उत्सुकता लागली आहे. आम्ही विजयी मालिका कायम राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्या योजनेत कोणताही बदल करणार नाही. स्पर्धेत आगेकूच करताना आम्ही एकावेळी एका सामन्यावर लक्ष देऊन तयारी करत आहोत. घरच्या चाहत्यांचा मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरणार असून या जोरावर आम्ही आगेकूच करु.'

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगMumbaiमुंबई