शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Lovlina Borgohain: वर्तमानपत्राचा तुकडा आयुष्याला वळण देऊन गेला!, लवलिनाचे कांस्य देईल प्रेरणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:25 IST

Lovlina Borgohain : बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे.

एक छोटा प्रसंग अनेकांना अशी काही प्रेरणा देऊन जातो की त्यांच्याकडून पुढे इतिहास रचला जातो. असा एक प्रसंग लवलिना बोरगोहेन हिला प्रेरणा देऊन गेला आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमधील तिसरे पदक मिळाले. 

बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे.

दोन जुळ्या बहिणींसोबत राहणाऱ्या लवलिनाच्या घरी खेळाचे वातावरण होतेच. दोन्ही बहिणी किक बॉक्सिंग उत्तम प्रकारे खेळत असल्याने लवलिनाही या खेळाकडे वळाली. परंतु, एका आनंदाच्या प्रसंगी वडील टिकेन यांनी वृत्तपत्रात गुंडाळून मिठाई आणली. मात्र चिमुकल्या लवलिनाची नजर त्या वृत्तपत्रातील एका खेळाडूच्या फोटोवर पडली. वडिलांकडे विचारपूस केल्यावर त्या खेळाडूचे नाव कळाले, मोहम्मद अली. बस्स.. मग काय अलीच्या पराक्रमाची माहिती मिळाल्यानंतर लवलिनानेही एक लक्ष्य निर्धारित केले ते म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियन होण्याचे आणि त्यानंतर जे घडले तो इतिहास... 

आठ वर्षे सुट्टी घेतली नाही!लवलिनाने तब्बल आठ वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता केवळ आपल्या लक्ष्याचा विचार केला. भारतात परतल्यानंतर लवलिनाने म्हटले होते की, ‘अनेक गोष्टींचा त्याग केल्याने आज हे पदक मिळाले आहे.’ २०१२ नंतर पहिल्यांदाच  सुट्टी घेत लवलिना पदकाचा आनंद साजरा करत आहे.  ती आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहिलीच, शिवाय  आवडत्या पदार्थांपासूनही दूर राहिली. आसाम सरकारने लवलिनाच्या गोलाघाट गावात पक्का रस्ता बांधून दिला आहे. 

लवलिनाची कामगिरी!आशियाई अजिंक्यपद : कांस्य (२०१७ व २०२१).जागतिक अजिंक्यपद : कांस्य  (२०१८ आणि २०१९).टोकियो ऑलिम्पिक : कांस्य (२०२१)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021