शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पिकलबॉलची आंतरराष्ट्रीय भरारी!

By admin | Updated: September 14, 2015 00:31 IST

सात-आठ वर्षांपूर्वी मुंबईत खेळण्यासाठी जागा शोधावी लागणाऱ्या पिकलबॉल या खेळाने आता आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून

रोहित नाईक, मुंबईसात-आठ वर्षांपूर्वी मुंबईत खेळण्यासाठी जागा शोधावी लागणाऱ्या पिकलबॉल या खेळाने आता आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून, गेल्यावर्षी दुहेरी सुवर्णपदक मिळवून भारताची शान वाढवणाऱ्या याच खेळातील दोन खेळाडू येत्या १८ ते २० सप्टेंबर दरम्यान स्पेनमध्ये माद्रिद येथे रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. द स्पॅनिश पिकलबॉल असोसिएशच्या वतीने आयोजित या दुहेरीच्या आंतररराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत आतापर्यंत ९ देशांतील १५० अधिक खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) वतीने आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत भारताचा सहभाग होण्याची ही केवळ दुसरीच घटना आहे. अनिश मेहता आणि शनय मेहता या पिता - पुत्रांची जोडी भारताचे प्रतिनिधित्त्व करणार असून याआधी अतुल एडवर्ड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गतवर्षी मे महिन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अतुल यांनी नेदरलँडच्या स्पर्धेत दुहेरीचे सुवर्ण पटकावल्याने मेहता जोडीकडूनसुध्दा याच कामगिरीची अपेक्षा होत आहे. या स्पर्धेत अनिश ५५ वर्षांवरील वयोगटात खेळतील तर शनय १९ वर्षांवरील वयोगटात खेळेल.गतवर्षी डिसेंबरमध्ये पिकलबॉलशी ओळख झाल्यानंतर अनिश यांनी या खेळासाठी स्वत:ला झोकून दिले. शनय हा कसलेला जिल्हास्तरीय टेबल टेनिस खेळाडू असून त्यानेही पिकलबॉलला आपलेसे केले. टेबल टेनिसचा फायदा या खेळामध्ये होत असल्याचे त्याने सांगितले. अनिश - शनय दोघेही पुरुष व मिश्र दुहेरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ते या स्पर्धेसाठी स्वखर्चाने सहभाग होत आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव मिळवण्यासाठी सहभाग होतोय. यावेळी आम्ही किती पाण्यात आहोत हे कळेल. विजेतेपदासाठी आमचा प्रयत्न नक्की असेल, असे अनिश यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्पर्धेचे वेळापत्रक :१७ व १८ सप्टेंबरला सर्व खेळाडूंचे सराव सत्र होईल. यामधूनच प्रत्येक खेळाडूंच्या जोड्या तयार होतील. यावेळी पिकलबॉल तज्ञ जेनिफर लुकोर आणि बॉब यंग्रेन यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळेल.१९ सप्टेंबरला महिला व पुरुष दुहेरी तर २० सप्टेंबरला मिश्र दुहेरी सामने रंगतील. मेहता पिता-पुत्र जोडीमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांच्या सहभामुळे स्पेनमध्ये तिरंगा फडकला जाईल. दोघांचा खेळ उत्कृष्ट असून ते नक्कीच यशस्वी होतील. तसेच एक खात्री नक्की देऊ शकतो की, स्पर्धेत दोघांचा खेळ लक्षवेधी ठरेल. मेहता जोडीची कामगिरी नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. - सुनील वालावलकर, अध्यक्ष, आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशन पिकलबॉल म्हणजे काय?लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेबल टेनिस यांचे मिश्रीत रुप म्हणजे ‘पिकलबॉल’. यामध्ये टेबल टेनिस पॅडलसारख्या आकाराने मोठ्या असलेल्या पॅडलने बॅडमिंटनच्या आकाराच्या कोर्टवर खेळावे लागते. तसेच खेळण्याची स्टाईल आणि नियम हे लॉन टेनिसप्रमाणे असतात. सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास टेबल टेनिससारख्या पॅडलने बॅडमिंटनच्या कोर्टवर लॉन टेनिस खेळणे म्हणजेच ‘पिकलबॉल’. शारिरीक तंदुरुस्तीसाठी अत्यंत उपयोगी असलेल्या या खेळामध्ये प्लास्टीक बॉलचा वापर होतो.