नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (एआयएफएफ) खा. प्रफुल्ल पटेल यांची गुरुवारी चार वर्षांसाठी फिफाच्या महत्त्वपूर्ण अर्थ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये पटेल यांची आशियाई फुटबॉल परिसंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या प्रमुखपदाच्या काळात भारतात पहिल्यांदा पुढील वर्षी १७ वर्षे गटाच्या फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एआयएफएफने एएफसी १६ वर्षे गटाच्या स्पर्धेचे यजमानपददेखील भूषविले होते. (वृत्तसंस्था)
पटेल ‘फिफा’च्या अर्थ समितीचे सदस्य
By admin | Updated: January 20, 2017 05:30 IST