शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

शरीरसौष्ठवपटूंची क्लासिक स्पर्धा रंगणार, देशातील अव्वल 30 खेळाडूंचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 17:34 IST

मुंबई : भारतीय शरीरसौष्ठव खेळातील सर्वात ग्लॅमरस स्पर्धा अशी ओळख असलेल्या तलवलकर क्लासिक स्पर्धेची रंगत २७ आणि २८ नोव्हेंबरला मुंबईत रंगेल.

मुंबई : भारतीय शरीरसौष्ठव खेळातील सर्वात ग्लॅमरस स्पर्धा अशी ओळख असलेल्या तलवलकर क्लासिक स्पर्धेची रंगत २७ आणि २८ नोव्हेंबरला मुंबईत रंगेल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगणार असून, अंतिम फेरी ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ओळखल्या जाणा-या षण्मुखानंद सभागृहामध्ये पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेची रंगत पाहायला मिळणार आहे.इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेले ३४ शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया या सारख्या मानाच्या स्पर्धेत पदक मिळवलेले दिग्गज खेळाडू एकाच मंचावर एकाच वेळी जेतेपद पटकवण्यास एकमेकांविरुद्ध तगडे आव्हान उभे करतील.एकूण तीन गटांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण मिश्र आणि तालबद्ध जोडी या गटाचे आहे. मिश्र गटामध्ये पुरुष व महिला शरीरसौष्ठवपटू जोडीने प्रदर्शन करतील. तर तालबद्ध गटामध्ये पुरुष - महिला जोडी ९० सेकंदाच्या वेळेत एका तालामध्ये प्रदर्शन करतील. याशिवाय वरिष्ठ पुरुष शरीरसौष्ठवपटू या मुख्य गटात जेतेपदाजी चुरस रंगेल. २९ नोव्हेंबरला षण्मुखानंद सभागृहामध्ये रंगणारी अंतिम फेरी अव्वल दहा खेळाडूंमध्ये रंगेल. या फेरीत स्थान मिळवण्यासाठी बलाढ्या महाराष्ट्रसह ओडिशा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे तगडे खेळाडू कडवी लढत देतील. तसेच सांघिक विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय रेल्वे, सेनादल आणि महाराष्ट्र यांच्यात मुख्य लढत असेल, अशी माहितीही स्पर्धा आयोजकांनी दिली.....................................बक्षिसांचा वर्षाव होणार...एकूण २० लाख रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या स्पर्धेत विजेत्या खेळाडूला ६ लाख रुपये रोख पटकावण्याची संधी असेल. तसेच अव्वल दहा खेळाडूंवरही रोख पारितोषिकांचा वर्षाव होणार असून उपविजेत्या खेळाडूला आणि तृतीय स्थानावरील खेळाडूला अनुक्रमे ३ लाख व ५० हजार रुपयांनी गौरविण्यात येईल......................................यांचे आहे आकर्षण...सलग दोनवेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव, नुकताच मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतील सुवर्ण विजेता महेंद्र चव्हाण, तीन वेळा मिस्टर आशिया ठरलेला बॉबी सिंग यांच्यासह राम निवास, सागर जाधव, अक्षय मोगरकर या अव्वल खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील.

टॅग्स :Mumbaiमुंबई