शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Paris Paralympics 2024 : भारताच्या Preethi Pal ची कमाल; पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पटकावलं दुसरं ब्राँझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 23:43 IST

प्रीतीनं १०० मीटर शर्यतीनंतर आता २०० मीटर शर्यतीतही मारलं मैदान

Paris Paralympics 2024  Preethi Pal clinches Bronze Medal At Women's 200m T3  : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पॅरालिम्पियन प्रीती पाल हिने कमालीच्या कामगिरीसह इतिहास रचला आहे. महिला गटातील २०० मीटर टी ३५ अंतिम फेरीत  (Women's 200m T3 Final) ३०.०१ सेकंद अशी वेळ नोंदवत तिने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

आधी १०० मीटर शर्यत जिंकली, मग २०० मीटरमध्येही कमी नाही पडली

पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत उतरणाऱ्या प्रीतीनं याआधी १०० मीटर टी ३५ प्रकारात कांस्य पदक कमावले होते. मैदानी खेळात भारताला पदक मिळवून देणाऱ्या या महिला धावपटूनं आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा महापराक्रम करुन दाखवला आहे.  

नेमबाजांची चौकार; प्रीतीचा डबल धमाका! भारताच्या खात्यात जमा केले सहावे पदक

पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या पदकासह प्रीतीनं भारताच्या खात्यात सहाव्या पदकाची नोंद केली आहे. याआधी भारताकडून अवनी लेखरा (सुवर्ण) आणि मोना अग्रवाल (कांस्य) यांनी १० मीटर एअर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला पदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर नेमबाज मनीष नरवाल याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली होती. रुबिना फ्रान्सिस हिने महिला गटातील १० मीटर एअर पिस्तूल एस एच १ प्रकारात कांस्य पदकी निशाणा साधला होता. नेमाजांच्या चार पदकासह प्रीतीनं एकटीनं १०० मीटरसह २०० मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली आहेत.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा