शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
2
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
3
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
4
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
5
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ५ जण दगावल्याची भीती
6
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
7
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
8
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
9
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
10
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
11
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
12
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
13
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
14
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
15
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
16
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
17
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
18
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
19
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
20
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

सलाम फौजी! LOC वरील स्फोटात गमावला होता पाय; पॅरिसमध्ये देशासाठी कमावलं मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 10:48 IST

शेवटी फौजीचं रक्त ते; असं दिमाखातच उसळायचं

Hokato Hotozhe Sema India’s Bronze Medal In  Paris Paralympics  2024 :पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदक जिंकण्याचा धडाका कायम  आहे.  शुक्रवारी आर्मी मॅन होकातो होतोझे सेमा (Hokato Hotozhe Sema ) याने पुरुष गटातील गोळाफेकमधील एफ ४७ प्रकारात (Shot Put F47 Event) भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. 

लढवय्या फौजीचा चौथा प्रयत्न होता सर्वोत्तम, त्याच जोरावर तिसऱ्या स्थानावर पोहचत मिळवलं कांस्य

भारताच्या या लढवय्या माजी फौजीनं  पहिल्या प्रयत्नान १३.८८ मीटर अंतरावर गोळा फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १४.०० मीटर, तिसऱ्या प्रयत्नात आणखी जोर लावून  १४.४० मीटर, चौथ्या प्रयत्नात  १४.६५ मीटर, पाचव्या प्रयत्नात १४.१५ मीटर आणि अखेरच्या प्रयत्नात १३.८० मीटर अंतरावर गोळा फेकला. चौथ्या प्रयत्नात पार केलेल्या अंतरामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यासह भारताच्या खात्यात २७ व्या पदकाची भर पडली. 

इराणला 'गोल्ड' तर ब्राझीलला 'सिल्व्हर'

या क्रीडा प्रकारात सोमन राणाच्या रुपात आणखी एका भारतीयाचा समावेश होता. त्याला १४.०७ या सर्वोत्तम कामगिरीसह सातव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. इराणच्या  यासीन खोसरावी याने १५.९६ मीटर थ्रोसह गोल्ड तर ब्राझीलच्या  पॉलिनो डॉस सँटोस याने १५.०६ मीटरसह रौप्य पदक पटकावले. 

कोण आहे Hokato Hotozhe Sema ज्यानं देशाची वाढवली शान होकातो होतोझे सेमा हा भारतीय लष्करातील सैनिक आहे. २००२ मध्ये LOC वरील सैन्याच्या एका मोहिमेच्या दरम्यान भूसुरुंग (Land mine) स्फोटातील दुर्घटनेत या जवानाला मोठी दुखापत झाली. शस्त्रक्रिया करून डावा पाय काढावा लागला. यातून सावरण्यासाठी खूप वेळ गेला. पण या माणसानं हार मानली नाही. लष्कराच्या प्रशासकीय विभागात कार्यरत राहून आर्मी पॅरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून देशासाठी एक वेगळी इनिंग  या आर्मी मॅननं सुरु केली. वयाच्या ३२ वर्षी गोळाफेक क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०२३ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक कमावले.

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारतParisपॅरिस