शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 25वे पदक, ज्युडोत कपिल परमारने पटकावले कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 21:54 IST

Paris Paralympics 2024 :पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ज्युडोमध्ये पदक जिंकले आहे.

Paris Paralympics 2024 : पॅरिसमध्ये आयोजित पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडू नवनवे विक्रम करत आहेत. दरम्यान, आज कपिल परमारने पुरुषांच्या पॅरा ज्युडो 60 KG (J1) स्पर्धेत मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ज्युडोमध्ये पदक जिंकले आहे.

5 सप्टेंबर (गुरुवार) रोजी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत कपिलने ब्राझीलच्या एलिटॉन डी ऑलिव्हेराचा एकतर्फी 10-0 असा पराभव केला. कपिलच्या कांस्यपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत.

कपिल परमारने उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचा 10-0 असा पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला इराणच्या एस. बनिताबाचा खोर्रम आबादीने पराभूत केले. या दोन्ही सामन्यात परमारला यलो कार्ड मिळाले होते. उपांत्य फेरीतील पराभवाने त्याचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न निश्चितच भंगले, मात्र आता त्याने कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते

1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल 2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 100 मीटर शर्यत 4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल 5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल 6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी 8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो 9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी 10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी 11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी 12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी 13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक 15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी 16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर 17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी 18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी 19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक 20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक 21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट 22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो 24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो 25. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष 60 किलो 

टॅग्स :ParisपॅरिसParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारत