शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympics 2024 : नियमांचा पुनर्विचार करा, विनेश फोगाटला रौप्य पदक द्या; सचिननं समजावलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:27 IST

वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले.

vinesh phogat latest news : भारताच्या आशेचा किरण, दिग्गज महिला कुस्तीपटू आणि मागील काही दिवसांपासून तमाम भारतीयांच्या ओठावर असलेले नाव म्हणजे विनेश फोगाट... विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठल्याने एक पदक निश्चित झाले होते. पण, त्याच्या पुढच्या काही तासातच भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करणारी बातमी समोर आली. विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र असल्याचे जाहीर झाले. तिचे वजन अतिरिक्त असल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. विनेश अपात्र घोषित होताच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली, काहींनी संताप तर अनेकांनी नाना प्रश्न उपस्थित केले. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याप्रकरणी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. 

सचिनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, अम्पायर्स कॉलचा विचार करण्याची वेळ आली आहे... प्रत्येक खेळाचे काही नियम ठरलेले असतात आणि ते नियम त्या त्या परिस्थितीच्या संदर्भाने पाहिले जाणे आवश्यक आहे. काही वेळा या नियमांचा पुनर्विचारही करायला हवा. नियमांचे पालन करून विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. पण, फायनलच्या आधी वजनामुळे ती अपात्र झाली. म्हणून तिचे रौप्य पदक हिसकावून घेणे हे अशोभनीय आहे आणि लॉजिक व खेळभावनेच्या विरोधात आहे. 

तसेच ताकद वाढावी या हेतूने ड्रग्जसारख्या औषधांचा वापर केला असता आणि नैतिक उल्लंघनासाठी खेळाडूला अपात्र ठरवले गेले असते तर ते समजण्यासारखे होते. असे असते तर कोणतेही पदक न देणे आणि शेवटचे स्थान देणे योग्य ठरेल. मात्र, विनेशने तिच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. ती नक्कीच रौप्य पदकासाठी पात्र आहे. आपण सर्वजण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. विनेशला ती ज्यासाठी पात्र आहे असा योग्य सन्मान मिळावा, अशी आशा करूया आणि प्रार्थना करूया, असेही सचिनने नमूद केले.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरVinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४