शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'धाकड' गर्ल विनेश फोगाटची फायनलमध्ये धडक; १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 23:41 IST

विनेश फोगाट ऑलिम्पिक इतिहासात फायनल खेळणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे.

Paris Olympics 2024: भारतीय प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) इतिहास रचला आहे. विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. मंगळवारी महिला मॅटवरच्या कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात फ्रीस्टाईल इव्हेंटमध्ये सेमीफायनलमध्ये क्यूबाची रेसलर युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव केला. आता विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे.

ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं तिच्याकडे गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. 

३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत विनेशनं १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने चांगली टेकडाउन करत आणखी ४ गुण मिळवले. संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय कुस्तीपटूचे बचावात्मक कौशल्य पाहण्यासारखे होते. केवळ  बचावात्मक खेळ न दाखवता काऊंटर अटॅक करून विनेशनं मॅचमध्ये वर्चस्व राखले आणि शेवटी ५-० असा विजय मिळवला. विनेशची आता अंतिम लढतीत अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी सामना होईल, जिनं २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.

मागील वर्षी विनेश फोगाटनं भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप करत दिर्घकाळ चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व केले होते. त्यामुळे खूप काळ ती मॅटपासून दूर होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये येताच विनेश फोगाट यांनी जबरदस्त यश मिळवलं आहे. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात आव्हान दिलं होतं. त्याआधी ती ५३ किमी वजनी गटात खेळत होती. 

कॉमनवेल्थमध्ये ३ गोल्ड मेडलची मानकरी

विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग ३ गोल्ड मेडल जिंकले होते. २०१४ ग्लास्गो, २०१८ कोस्ट आणि २०२२ बर्मिंघम येथील स्पर्धेत गोल्ड पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेशनं २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. एशियन चॅम्पियनशिप २०२१ मध्येही विनेश फोगाटनं गोल्ड जिंकत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ३ सिल्व्हर मेडलही जिंकले आहे. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती