शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Paris Olympics 2024 : पदकविजेत्या मनू भाकरचा सन्मान! सरकारकडून पैशांचा वर्षाव; धनादेश सुपूर्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:22 IST

Manu Bhaker Latest News : दोन कांस्य पदकविजेत्या मनू भाकरवर पैशांचा वर्षाव.

Paris Olympics 2024 Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला आतापर्यंत केवळ तीन पदके जिंकता आली आहेत. या तीन कांस्य पदकांपैकी दोन पदके मनू भाकरने जिंकली. त्यामुळे मनू भाकर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. पॅरिसच्या धरतीवर तिरंगा फडकावणाऱ्या मनूचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकरला तिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल मोठे बक्षीस दिले. मनू भाकरने केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. 

मनू भाकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने ३० लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले. 

मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी 

  • २८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. 
  • ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
  • ३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले. 
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत