शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Paris Olympics 2024 : भारताची आणखी एक खेळाडू फायनलमध्ये; दुसऱ्या शिलेदाराची थोडक्यात संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 14:54 IST

Ramita Jindal : भारताची रमिता जिंदाल फायनलसाठी पात्र ठरली.

Paris Olympics 2024 : भारताच्या आणखी एका नेमबाज खेळाडूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मनू भाकरपाठोपाठ रविवारी नेमबाज रमिता जिंदाल फायनलसाठी पात्र ठरली. भारताच्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल महिला एकेरीत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. २० वर्षीय रमिता जिंदाल पात्रता फेरीत ६३१.५ गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. तिने सर्व सहा सीरिजमध्ये १०० पेक्षा जास्त स्कोअर केला. याच स्पर्धेत भारताची इलावेनिल ही ६३०.७ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिली. त्यामुळे तिला अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. (Ramita Jindal news)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताची दुसरी फायनलिस्ट म्हणून नेमबाज रमिता जिंदालच्या नावाची नोंद झाली. ती सोमवारी २९ जुलै रोजी किताबासाठी अर्थात पदकासाठी भिडेल. अव्वल आठ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. भारताची रमिता पाचव्या स्थानी राहिल्याने तिला फायनलचे तिकीट मिळाले. दुसरी भारतीय स्पर्धक एलावेनीलचे शेवटचे दोन शॉट चुकल्याने तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. एकूणच तिची थोडक्यात संधी हुकली. 

दरम्यान, शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले होते. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. शनिवारी भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत