शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Paris Olympics 2024 : भारताची जोडी सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर; उपांत्य फेरीत अपयश, कांस्यसाठी भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 19:23 IST

Dhiraj Bommadevara-Ankita Bhakat Mixed Archery : भारताचे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. 

paris olympics 2024 Updates In Marathi । पॅरिस : तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत भारताने सुरुवातीलाच चांगली आघाडी घेतली. उपांत्य फेरीत भारताची लढत बलाढ्य कोरियासोबत झाली. पहिला सेट भारताच्या नावावर झाला अन् तमाम भारतीयांना सुखद धक्का बसला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाच गुणांची आवश्यकता होती. पहिला सेट जिंकल्यामुळे भारतीय जोडीला दोन गुण मिळाले. पण, कोरियाने चांगला कमबॅक करत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. या घडीला तीन गुणांची आघाडी कोरियाकडे होती. अखेर दुसरा सेट कोरियाने आपल्या नावावर केला. 

तिसऱ्या सेटमध्येही कोरियन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पण, भारताच्या अंकितानेही चांगले पुनरागमन केले. परंतु, यावेळी धीरजला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. कोरियाकडे ४-२ अशी आघाडी होती. आघाडी कायम ठेवत कोरियाच्या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला. २-६ अशा फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला. आता भारताचे शिलेदार दुसऱ्या उपांत्य फेरीत हरलेल्या संघाबरोबर कांस्य पदकासाठी लढतील. अमेरिका किंवा जर्मनीविरूद्ध भारताचा सामना होऊ शकतो.  भारताच्या तिरंदाजी संघाने उपांत्य फेरीसाठीच्या लढतीत अप्रतिम कामगिरी करताना पदकाच्या दिशेने कूच केली. अंकिता आणि धीरज यांनी स्पेनच्या तिरंदाजांचा पराभव केला अन् उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत धडक मारून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या, त्या अद्याप कायम आहेत. कारण उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरी भारत कांस्य पदक जिंकू शकतो. स्पेनच्या जोडीला ५-३ ने असा पराभव करण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत