शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:13 IST

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चीन आणि अमेरिकेने सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

Paris Olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे खेळाचा 'महाकुंभ' म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा भारताकडून 117 खेळाडू सहभागी झाले, पण कोणालाही सुवर्णपदक जिंकता आले नाही. परंतु इतर देशांतील काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकली आहेत. सुवर्णपदक जिंकण्यामध्ये अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपानसह अनेक देश आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये फ्रेंच अॅथलीट लिओन मार्चंडने सर्वाधिक 4 सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे.

एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणारे खेळाडूयंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जलतरणपटू लिओन मार्चंडने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक 4 सुवर्णपदके जिंकली आहेत. 22 वर्षीय लिओन मार्चंडची तुलना महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सशी केली जाते. मार्चंडने अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 2 सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये 3-3 सुवर्णपदके जिंकली आहेत. यात यूएसएची टोरी हस्के, सिमोन बिल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ'कॅलाघन यांचा समावेश आहे.

एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारे दोन खेळाडूएका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम दोन खेळाडूंच्या नावावर आहे. पहिला रशियन जिम्नॅस्ट ॲथलीट अलेक्झांडर डेटियाटिन आहे, ज्याने 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये 8 पदके जिंकली होती. यापैकी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सने हा पराक्रम दोनदा केला. त्याने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके जिंकली, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदके जिंकली. एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा मायकेल फेल्प्सच्या नावावर आहे. त्याच्या नावावर एकूण 28 ऑलिम्पिक पदके असून, यातील 26 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके आहेत. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४AmericaअमेरिकाIndiaभारत