शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय' नीरजचा जबरा फॅन! सायकलवरून गाठलं पॅरिस; २२ हजार किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 18:12 IST

Olympics 2024 Neeraj Chopra : नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा भारतीयांना पदकाची आशा असेल.

Fayis Asraf Ali Support Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यंदाच्या ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे. भारताचा गोल्डन बॉय पॅरिसला पोहोचला आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकताच नीरज प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला... अनेक बड्या कंपनींनी जाहीरातीसाठी नीरजला आमंत्रण दिले. नीरज चोप्राचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तो सज्ज आहे.

नीरज चोप्राची पात्रता फेरी ६ ऑगस्टला होणार आहे. चोप्राला भेटण्यासाठी त्याचा एक जबरा फॅन पॅरिसच्या धरतीवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे तो चाहता विमानाने नाही तर नीरज चोप्राला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून पॅरिसला पोहोचला आहे. फायिस असरफ अली असे या चाहत्याचे नाव आहे. नीरज चोप्राचा जबरा फॅन फायिस असरफ अलीने १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रवास सुरू केला आणि १७ देशांमधून पॅरिसला पोहोचण्यासाठी त्याला दोन वर्षे लागली. 'भारत ते लंडन सायकलिंग करून शांतता आणि एकतेचा संदेश देणे' हा त्याचा प्रमुख उद्देश होता. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याला जेव्हा कळले की नीरज चोप्रा देखील बुडापेस्टमध्ये राहत आहे. तेव्हा त्याने तिथे जाऊन भारताच्या गोल्डन बॉयची भेट घेतली. 

फायिस असरफ अलीला नीरजने सल्ला दिला की, जर तू लंडनला जात असशील तर पॅरिसलाही ये... आणि तिथे ऑलिम्पिकचा आनंद घे. नीरजच्या या सल्ल्यानुसार अलीने आपला प्लॅन बदलला आणि पॅरिस ऑलिम्पिकला जाण्याची तयारी केली. त्याने व्हिसा मिळवला आणि नंतर तो ब्रिटनमधून पॅरिसला गेला. अलीने २ वर्षात २२ हजार किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आणि ३० देश पार करून तो पॅरिसला पोहोचला.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारत