शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खेळाडूने आनंदात मारली उडी; खाली बसताच निखळला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 13:44 IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत एका खेळाडूसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे.

Paris Olympics 2024 : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच पॅरिसमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ही  फ्रान्समध्ये आयोजित केलेली सर्वात मोठी स्पर्धा आहे. सध्या दररोज वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंच्या विविध खेळातील विजयाच्या बातम्या येत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेमधील खेळांबरोबरच खेळाशिवायच्या गोष्टीही चांगल्याच चर्चेत आहे. अशातच विजयानंतर एका खेळाडूचे सेलीब्रेशन त्याला चांगलेच महागात पडलं आहे. कांस्य पदक जिंकल्यानंतर खेळाडूने असा काही आनंद व्यक्त केला की त्याचे हाड मोडले.

सोमवारी पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात ज्युडो स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर मोल्दोव्हाच्या आदिल ओस्मानोव्हने इटलीच्या मॅन्युएल लोम्बार्डोवर विजय मिळवून त्याच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकावर शिक्कामोर्तब केले. मात्र जिंकल्यानंतर उत्साही ओस्मानोव्हने आनंदात उजवा हात उंचावल्यामुळे त्याचा आनंद लवकरच वेदनांमध्ये बदलला.

मोल्दोव्हाचा ज्युडो खेळाडू आदिल ओस्मानोव्ह याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात त्याने इटलीच्या मॅन्युएल लोम्बार्डोचा पराभव करत आनंदाने उडी मारली. त्यानंतर तो आनंदाने ओरडला आणि गुडघे टेकून खाली बसला. या उडीमध्ये त्याचा खांदा निखळला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याने डाव्या हाताने दुखापतग्रस्त खांदा पकडला आणि इतर पदकविजेत्या खेळाडूंसोबत पदक घेण्यासाठी सहभागी झाला.  

"पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि सामन्यापूर्वी मी आजारी होतो. हे खूप अवघड होते आणि सरावादरम्यान मला वाईट वाटले. पण माझ्यासोबत असे घडल्यानंतरही मला पदक मिळाले. माझ्याकडे सामन्यातून माघार घेण्याचा पर्याय नव्हता. मी माझे पदक दिवंगत वडिलांना समर्पित करतो. त्यांनी स्वतः ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पाहिले होते. पैशाअभावी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तेव्हा त्यांचे एक मूल ऑलिम्पिकमध्ये पोहोचेल आणि पदक जिंकेल, असे स्वप्न होते. आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे," अशा शब्दात आदिल ओस्मानोव्हने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पॅरिसमध्ये मिळालेल्या यशानंतर मोल्दोव्हनचे अध्यक्ष माईया सांडू यांनी ओस्मानोव्हचे अभिनंदन केले." मोल्दोव्हासाठी आणखी एक कांस्यपदक!ऑलिम्पिकमधील प्रभावी कामगिरीबद्दल आमच्या आदिल ओस्मानोव्हचे अभिनंदन. तुमचे यश हा आम्हा सर्वांचा विजय आहे," असे माईया सांडू यांनी म्हटलं.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Accidentअपघात