शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात; तिरंदाजांच्या दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:44 IST

10M Air Rifle Mixed Indian Team, Paris Olympics 2024: भारतासाठी आजच्या दिवसात केवळ ही एकमेव पदकांची स्पर्धा होती.

10M Air Rifle Mixed Indian Team, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात भारतासाठी फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच दिवशी (२७ जुलै) भारतीय नेमबाजांनी निराशा केली. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन्ही भारतीय जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग ही जोडी १२व्या स्थानी राहिली. तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांनी सहावा क्रमांक पटकावला. रमिता-अर्जुनने एकूण ६२८.७ गुण मिळवले. तर इलावेनिल-संदीप यांना ६२६.३ गुण मिळाले. पण दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात आली.

केवळ 'टॉप-4' संघच अंतिम फेरीत:-

१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत केवळ 'टॉप-4' संघच पदक फेरीसाठी पात्र ठरले. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ जुलै रोजी होणार आहे. भारतासाठी आजच्या दिवसात केवळ ही एकमेव पदकांची स्पर्धा होती. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताकडून पदक जिंकण्याचा विक्रम वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या नावावर आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यावेळी मात्र पहिल्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

  • १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी:-
  1. रमिता जिंदाल- पहिली फेरी: १०४.६, दुसरी फेरी १०४.४, तिसरी फेरी १०५.५, एकूण: ३१४.५ गुण
  2. अर्जुन बबुता- पहिली फेरी: १०४.१, दुसरी फेरी १०६.२, तिसरी फेरी १०३.९, एकूण: ३१४.२ गुण
  3. इलावेनिल वालारिवन- पहिली फेरी: १०३.४, दुसरी फेरी १०४.७, तिसरी फेरी १०४.५, एकूण: ३१२.६ गुण
  4. संदीप सिंग- पहिली फेरी: १०४.१, दुसरी फेरी १०५.३, तिसरी फेरी १०४.३, एकूण: ३१३.७ गुण
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४ShootingगोळीबारIndiaभारत