शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मार मुसंडी! कुस्तीपटू अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, पदकाची आस वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:09 IST

Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024: अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे. आखाड्यातून पदक येणार?

Aman Sehrawat Wrestling, India at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आखाड्यातून पदकाची आस वाढली आहे.  भारताचाकुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने 57 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवला पराभूत केले. एका बाजूला महिला गटात अंशु मलिकला पराभवाचा सामना करावा लागला असताना अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे. 

आक्रमक अंदाजानं प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर ढकललं

अमन सेहरावत याने क्वार्टर फायनल लढतीत सुरुवातीच्या फेरीपासूनच आपली पकड मजबूत करण्यावर भर दिला. आक्रमक खेळ दाखवत त्याने अल्बेनियाच्या पैलवानाला बॅकफूटवर ढकलले. त्याचा आक्रमक तोरा पाहून जेलिमखान एबकारोव हा बचावात्मक खेळताना दिसला.  याचा फायदा उठवत अमन सेहरावत याने संधीच सोनं करत परफेक्ट डाव टाकून 3-1 अशी आघाडी घेतली होती.

मग खेळला  8 गुण मिळवून देणारा जबऱ्या डाव

अमन सेहरावत याने दुसऱ्या फेरीत आक्रमकता आणखी वाढवली. दुसऱ्या मिनिटात त्याने 8 अंक मिळवून देणारा डाव खेळला. ज्यात त्याने प्रतिस्पर्धी एबकारोव याला तीन वेळा फिरवले. पहिल्या फेरीतील 3 गुण आणि त्यानंतर 8 अंक मिळवून देणारा डाव खेळत अमन सेहरावत याने 11-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टेक्निकल सुपपीरियॉरिटीनुसार त्याला विजयी घोषित करण्यात आले.

सेमीफायनलमध्ये या पैलवानाविरुद्ध भिडणार अमन

अमन सेहरावत याची सेमीफायनलमधील लढत ही जपानच्या रेई हिगुची याच्याविरुद्ध रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी ही लढत रंगणार आहे. जपानी कुस्तीपटूनं 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्याला चीतपट करत फायनल खेळण्याच्या इराद्यानेच अमन सेहरावत आखाड्यात उतरेल.

एक नजर अमन सेहरावतच्या लक्षवेधी कामगिरीवर

हरियाणाच्या या 21 वर्षीय मल्लानं 2022 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदक कमावले होते. 2023 मध्ये कझाकिस्तान येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीतील सातत्य राखून सोनेरी डाव खेळण्याची संधी त्याच्याकडे आहे. यासाठी आधी त्याला जपानी कुस्तीपटूला आसमान दाखवावं लागेल. ही लढत जिंकली की, भारताचे आणखी एक पदकं निश्चित होईल.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीIndiaभारत