शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Paris Olympic 2024 : भारताला पहिलं पदक मिळालं! Manu Bhaker ने तमाम देशवासियांना खुशखबर दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:57 IST

Paris Olympic 2024 News : भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकण्यात यश आले.

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. खरे तर पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले होते. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. शनिवारी भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. 

१० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ खेळाडू होते. फायनलमध्ये सुरुवातीला ५ शॉट्सच्या दोन सीरिज असतात (प्रत्येक शूटरसाठी ५ + ५ शॉट्स (एकूण १० शॉट्स). २५० सेकंदात एक शॉट्स पूर्ण करणे गरजेचे असते. यातील प्रत्येक २ शॉट्सनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळेपर्यंत सर्वात कमी गुण मिळवणारा नेमबाज स्पर्धेबाहेर होत गेला. भारताची मनू भाकर सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकावर होती. कोरियाची खेळाडू अव्वल क्रमांकावर होती. मग मनूची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 

Paris Olympic 2024 : खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS

मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. 

Paris Olympic 2024 : मनू भाकरनं भारतासाठी पदक जिंकलं; विजयानंतर तिनं भगवतगीतेला श्रेय दिलं, वाचा

दरम्यान, भारताच्या मनू भाकरने शनिवारी चमक दाखवून १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५व्या स्थानी राहिली. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्यामुळे भारताच्या रिदिमाचे आव्हान शनिवारीच संपुष्टात आले. फायनलमध्ये अखेरच्या क्षणी मनू दुसऱ्या स्थानी आल्याने भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त रौप्य की कांस्य याची देशवासियांना प्रतीक्षा होती. अखेर २२ वर्षीय मनूने कांस्य पदकाला गवसणी घातली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत