शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 03:32 IST

दोन वेळा आडवा आलेला जर्मनीच्या ज्युलियन वेबर पडला मागे 

Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025 : भारताचा 'गोल्डन बॉय' आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. फ्रान्स येथील स्टेड सेबास्तियन चार्लेटी येथे पार पडलेल्या पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेतील  फायनलमध्ये नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर सर्वोत्तम फेकीसह या मोहीमेची सुरुवात केली. हा प्रयत्न त्याला अव्वलस्थानावर कायम ठेवण्यास पुरेसा ठरला. 

पॅरिसमधील प्रतिष्ठित स्पर्धेत नीरज चोप्रासमोर मागील दोन स्पर्धेत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे आव्हान होते.  यावेळी मात्र नीरज त्याच्यावर भारी पडला. जर्मनीच्या वेबरला  पहिल्या प्रयत्नातील ८७.८८ मीटर लांब अंतरावरील फेकीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

पहिला प्रयत्नातील फेकीच ठरली सर्वोत्तम 

पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर फेकीसह जबरदस्त सुरुवात करणाऱ्या नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात ८५.१० मीटर अंतर भाला फेकला. तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरल्यावर सहाव्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८२.८९ मीटर लांब भाला फेकल्याचे पाहायला मिळाले. तीन प्रयत्न फसले. एवढेच नाही तर यावेळी ९० पारचा डावही साधता आला नाही. पण पहिल्या प्रयत्नातील फेकी सगळ्या स्पर्धकांमध्ये भारी ठरली अन् अव्वल क्रमांकावर राहत त्याने स्पर्धा गाजवली.

आठ वर्षांनी उतरला होता मैदानात 

जवळपास आठ वर्षांनी नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत सहभागी झाला होता. २०१७ मध्ये नीरज चोप्राला ८४.६७ मीटर थ्रोसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मे २०२५ मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत ९० मीटर पारचे ध्येय साध्य केल्यावर नीरज चोप्रा  यंदाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने मैदानात उतरला अन् त्याने ही स्पर्धाही जिंकूनही दाखवली.

दोन वेळा आडवा आलेल्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरला टाकलं मागे  

पॅरिसमधील स्पर्धेआधी दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रानं ९०.२३ मीटरसह हंगामातीलच नव्हे तर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट थ्रोची नोंद केली होती. पण यावेळी जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं शेवटच्या प्रयत्नात ९१.०६ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजला मागे टाकले होते. मे २०२५ मध्ये पोलंड येथील स्पर्धेतही वेबरनं ८६.१४ मीटर थ्रोसह नीरजला मागे टाकत स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत नीरज चोप्रा ८४.१४ मीटरसह जर्मनीच्या खेळाडूच्या मागे राहिला होता. पण यावेळी मात्र नीरजनं त्याला मागे टाकले.  ८८.१६ मीटर लांब भाला फेकत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या खेळाडूला भारतीय स्टार भाळाफेकपटूनं पहिल्यांदाच पराभूत केले. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा