शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

युवा पोरानं मैदान मारलं! अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यसह भारताला मिळवून दिले सहावे पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 23:56 IST

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून अखेर भारताला पहिलं पदक मिळालं;भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून अखेर भारताला पहिले पदक मिळाले आहे. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. त्याने 57 किलो वजनी गटात प्यूर्तो रिकोच्या डिरियन क्रूज याला 13-5 अशा फरकाने पराभूत करत ब्राँझ पदकाला गवसणी घातली. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे सहावे पदक ठरले.  

पठ्ठ्यानं 16 वर्षांची कुस्तीची परंपरा कायम राखली 

2008 नंतर प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटूंनी भारताला पदक मिळवून दिले आहे. अमन याने कुस्तीची ही 16 वर्षांची परंपरा कायम ठेवणारी कामगिरी केली. त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तो फक्त 21 वर्षांचा आहे. भविष्यात त्याच्याकडून आणखी  अपेक्षा असतील. युवा पैलवानावर आता शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. गीता फोगाट हिने देखील अविस्मरणीय कामगिरीबद्दल अमन शेहरावतला शुभेच्छा दिल्या आहेत.    

तगड्या पैलवानांना आस्मान दाखवतं गाठलं पोडियम 

अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने सेमी फायनलपर्यंत धडक मारत पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये आपल्यातील धमक दाखवून दिली होती. पण सेमीच्या लढतीत त्याला जपानच्या रेई हिगुची याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणाच्या या युवा पैलवानाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. पण या पठ्ठ्यानं पदकासाठीच्या लढतीत जोर लावत शेवट मात्र गोड केला. या स्पर्धेत त्याने माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मासेडोनियाच्या व्लादिमिर इगोरोव याला 10-0 तर अल्बेनियाच्या जेलीमखान अबाकारोव याला 12-0 गुणांनी पराभूत करत पदकाच्या शर्यतीत टिकून होता. 

भारताच्या खात्यात 6 पदकं, मनूसह पॅरिसमध्ये या खेळाडूंना मिळालं यश

अमनशिवाय मनू भाकर ( 10 मीटर एअर पिस्तूल ), मनु भाकर आणि सरबज्योत सिंग ( 10 मीटर एअर पिस्तूल  मिश्र टीम इवेंट ), स्वप्निल कुसाळे ( 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स ) आणि नीरज चोप्रा याने भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. भारतीय पुरूष हॉकी संघानेही स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली आहे.

गत ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत आलेख ढासळला!  

 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचा आकडा हा टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत वाढेल. एवढेच नाही तर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारत दुहेरी आकडा पार करेल, अशी अपेक्षा होती. पण अनेक अनपेक्षित निकाल आणि सुवर्ण पदकाशिवाय भारताच्या खात्यात आतापर्यंत फक्त 6 पदकं जमा झाली आहेत. जर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं विनेश फोगाट प्रकरणातील निर्णय सकारात्मक दिला. तर भारताच्या खात्यात किमान गत ऑलिम्पिक प्रमाणे 7 पदकं जमा होतील. यातही सुवर्णाची उणीवच असेल. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीIndiaभारत