शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण, रौप्यपदकासह भारताचा दबदबा,धर्मबीरने मोडला आशियाई विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 06:49 IST

Paralympic Games: भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमधील शानदार कामगिरी कायम राखली असून, बुधवारी मध्यरात्री क्लब थ्रो खेळामध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. धर्मबीर याने आशियाई विक्रम मोडताना एफ-५१ क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्ण जिंकले, तर प्रणव सूरमा याने रौप्यपदकावर नाव कोरले.

पॅरिस  - भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमधील शानदार कामगिरी कायम राखली असून, बुधवारी मध्यरात्री क्लब थ्रो खेळामध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. धर्मबीर याने आशियाई विक्रम मोडताना एफ-५१ क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्ण जिंकले, तर प्रणव सूरमा याने रौप्यपदकावर नाव कोरले. यासह या स्पर्धेत भारताचा दबदबा राहिला.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता धर्मबीर याने स्पर्धेला सुरुवात केली. परंतु, त्याचे सुरुवातीचे चारही प्रयत्न अवैध ठरल्याने भारतीयांवर दडपण आले. पाचव्या प्रयत्नात मात्र धर्मबीरने ३४.९२ मीटरची जबरदस्त फेक केली आणि हीच स्पर्धेतील सर्वोत्तम फेकही ठरली. 

यानंतर प्रणवने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ३४.५९ मीटरची फेक करत मिळवलेले दुसरे स्थान अखेरपर्यंत कायम राखले. सर्बियाच्या फिलिप ग्राओवाक याने ३४.१८ मीटरसह कांस्य पटकावले. धर्मबीरने जिंकलेले पदक भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले. एका कालव्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सूर मारल्याने धर्मबीर गंभीररीत्या जखमी झाला होता. 

सुवर्ण प्रशिक्षकांसाठी : धर्मबीरमी सुवर्णपदक जिंकून खूश आहे. माझे स्वप्न आज साकार झाले आहे. मार्गदर्शक अमितकुमार सरोहा यांची पदक विजयात मोलाची भूमिका असून हे सुवर्ण मी त्यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया धर्मबीर याने व्यक्त केली. याच स्पर्धेत धर्मबीरसह अमित यांनीही सहभाग घेतला होता. परंतु, एकीकडे धर्मबीर अव्वल स्थानी राहिला असताना त्याचे गुरू मात्र अखेरच्या स्थानी राहिले. धर्मबीर आणि प्रणव यांनी अमितकुमारच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे शिक्षक दिनीच माझ्या शिष्यांनी मला सर्वांत मोठी गुरुदक्षिणा दिल्याची प्रतिक्रिया अमितकुमारने व्यक्त केली. 

क्लब थ्रो म्हणजे?क्लब थ्रो हा गोळा, थाळी आणि भालाफेकनंतरचा चौथा प्रकार आहे. केवळ पॅरालिम्पिकमध्ये तो खेळला जातो. मुदगलच्या आकारासारख्या बारीक लाकडी दांडुक्याचा खालचा भाग हा धातूचा बनलेला असतो. हा क्लब बोटांच्या साहाय्याने पकडून जास्तीत जास्त दूरवर फेकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतो. या खेळामध्ये रशियाच्या मुसा तैमाझोव याने २०२३ मध्ये ३६.२२ मीटरची फेक करत विश्वविक्रम नोंदवला.

 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारत