शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

YouTube बघून खेळ शिकली; आता रोईंगमध्ये अनितानं नारायण यांच्यासह फायनल गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 16:31 IST

रिपेचेज फेरीत ७:५४.३३ वेळेसह निर्धारित अंतर पार करत ही जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली

पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा रोवर जोडीनं फायनलमध्ये धडक मारली आहे. अनिता आणि नारायण कोंगनपल्ले ही जोडी PR3 Mixed Double Sculls रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. रिपेचेज फेरीत ७:५४.३३ वेळेसह निर्धारित अंतर पार करत या जोडीनं तिसरे स्थान पटकावले. त्यांचा हा प्रयत्न फायनलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुरेसा आहे. 

पदकाच्या इराद्यानेच जोडी फायनलमध्ये उतरेल

पण पदक जिंकायचे असेल तर त्यांना आणखी जोर लावावा लागणार आहे. अनिता आणि नारायण गोंगनपल्ले कामगिरीत आणखी सुधारणा करून पदक मिळवण्याच्या इराद्याने अंतिम सामन्यासाठी तयार होतील, अशी अपेक्षा आहे. १ सप्टेंबरला दुपारी २ वाजता ही जोडी पदाकाच्या अपेक्षेसह फायनल खेळताना दिसेल. 

दक्षिण कोरियात पार पडलेल्या जागतिक रोईंग आशियाई आणि ओशियन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पात्रता रेगाटा २०२४ स्पर्धेत पॅरा मिक्स डबल स्कल्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.  भारताच्या या जोडीने ७:५०:८० वेळ नोंदवत पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. 

अशी जमली ही जोडी

आंध्र प्रदेशमधील नारायण २०१८ पासून रोइंगमध्ये आहेत. पण अनिता आणि नारायण यांनी २०२२ पासून भारतासाठी एकत्र स्पर्धेत उतरण्यास सुरुवात केली. आशियाई क्रीडा २०२३  आणि  पॅरालिम्पिक २०२४  स्पर्धेत PR3 प्रकारात पुरुष दुहेरीचा समावेश नव्हता. त्यामुळे मिश्र दुहेरीच्या माध्यमातून स्पर्धेत उतरण्यासाठी नारायण यांना एका पार्टनरची आवश्यकता होती. ते अनिताला पुण्यात भेटले. या भेटीनंतर त्यांनी  अनिताला रोईंगच्या या मिश्र दुहेरीतील भारतासाठी अगदी नव्या असणाऱ्या इवेंटसाठी तयार केले. 

युट्युबवरुन घेतली खेळाची माहिती,  आता पॅरालिम्पिकची फायनल गाठली

अनिताने एका मुलाखतीत म्हटले होते की, नारायण सरांना भेटले त्यावेळी खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांनी समजून सांगितल्यावर हा खेळ खेळू शकतो असा विश्वास निर्माण झाला. YouTube च्या माध्यमातून खेळ शिकला. त्यानंतर सरावाला सुरुवात केली, असा किस्सा अनिताने शेअर केला होता. 

 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४