शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पॅरा आशियाई; शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 01:40 IST

गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता.

जकार्ता : गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. दोन वर्षांचा असताना पोलिओविरोधी मोहिमेत बानावट औषधाचा डोस दिल्यामुळे शरदवर ही परिस्थिती ओढवली होती.विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता असलेल्या २६ वर्षांच्या शरदने उंच उडीच्या टी-४२/६३ प्रकारात १.९० मीटर उडी घेत आशियाई तसेच स्पर्धा विक्रमांची नोंद केली. टी ४२/६३ प्रकार शरीराच्या खालच्या भागातील दिव्यांगाशी संबंधित आहे. आॅलिम्पिक कांस्य विजेता वरुण भाटी याने १.८२ मीटर उडी घेत रौप्य जिंकले. कांस्य थंगावेलू मरियप्पनला मिळाले. मरियप्पनने याच प्रकारात रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते, हे विशेष.ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड प्रकारात आनंदन गुणसेकरमने टी ४४,६२/६४ प्रकारात रौप्य व विनय कुमारने कांस्य जिंकले. टी४५/४६/४७ प्रकारात संदीप मान याला कांस्य मिळाले. हे दोन्ही प्रकार पायाच्या वरील भागाच्या दिव्यांगाशी संबंधित आहेत. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत (अंधत्व) राधा व्यंकटेशला कांस्य, तर जलतरणात स्वप्निल पाटीलला ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्यवर समाधान मानावे लागले.गुर्जरला भालाफेकीत रौप्य; देवेंद्र झाझरियाकडून निराशाभारताचा भालाफेकपटू सुंदरसिंग गुर्जर याने गुरुवारी पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, दोन वेळेचा सुवर्ण विजेता, ‘खेलरत्न’चा मानकरी देवेंद्र झझारिया याने घोर निराशा केली. तो चौथ्या स्थानी राहिला.एफ ४६ हा प्रकार शरीराच्या वरच्या भागातील दिव्यंगत्वाशी संबंधित आहे. ४०० मीटर शर्यतीत (टी१३) अवनिलकुमारने कांस्य जिंकले. टी१३ हा प्रकार अंधूक दिसण्याशी संबंधित आहे. गुर्जरने ६१.३३ मी. फेक करीत रौप्य जिंकले. रिंकूने ६०.९२ मी. वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीसह कांस्य जिंकले.

टॅग्स :Asian Para Games 2018आशियाई पॅरा स्पर्धा 2018