शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पेस-हिंगीस चॅम्पियन

By admin | Updated: September 13, 2015 04:19 IST

अनुभवी लिएंडर पेसने स्वित्झर्लंडची ‘लकी गर्ल’ मार्टिना हिंगीससोबत अमेरिकन ओपन टेनिसमधील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

न्यूयॉर्क : अनुभवी लिएंडर पेसने स्वित्झर्लंडची ‘लकी गर्ल’ मार्टिना हिंगीससोबत अमेरिकन ओपन टेनिसमधील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ओपन युगमधील पेसच्या नावे सर्वाधिक मिश्र दुहेरीच्या जेतेपदांची नोंद झाली आहे.भारत-स्विस चौथ्या मानांकित जोडीने बेथानी माटेक सॅन्ड्स आणि सॅम क्वेरी या अमेरिकेच्या बिगरमानांकित जोडीचा काल रात्री अंतिम लढतीत ६-४, ३-६, १०-७ ने पराभव केला. यंदाच्या मोसमात या जोडीचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे. पेसच्या नावे मिश्र दुहेरीची नऊ ग्रॅण्डस्लॅम झाली आहेत. त्याने आपला माजी जोडीदार महेश भूपती याला मागे टाकले.भूपतीच्या नावे मिश्र प्रकारात आठ जेतेपदांची नोंद आहे. महान मार्टिना नवरातीलोवा हिच्या दहा जेतेपदाच्ंया तुलनेत पेस केवळ एका जेतेपदाने मागे आहे. दहापैकी दोन जेतीपद नवरातीलोवाने पेससोबत खेळून जिंकली, हे विशेष. या जोडीने २००३मध्ये आॅस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते.यंदा आॅस्ट्रेलिया आणि विम्बल्डनचे आधीच जेतेपद पटकविणाऱ्या पेसने हिंगीससोबत अमेरिकन ओपन जिंकून वर्षभरात तीन स्पर्धा जिंकण्याचा १९६९ नंतर प्रथमच विक्रम केला. हिंगीसने पहिले मिश्र जेतेपद २००६मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनच्या रूपात भूपतीच्या सोबतीने जिंकले होते. हिंगीस महिला दुहेरीतही सानिया मिर्झासोबत जेतेपदाच्या दावेदारीत कायम आहे.पेस-मार्टिनाने पहिल्याच सेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस मोडीत काढून २-१ अशी आघाडी मिळविली. नंतर ५-४ या स्कोअरवर पेसने सर्व्हिस राखून सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये एकमेव ब्रेक निर्णायक ठरला. या सेटमध्ये प्रतिस्पर्धी जोडीने बाजी मारून लढत १-१ ने बरोबरीत आणली होती. सुपर टायब्रेकरमध्ये पेस-हिंगीसच्या धारदार फटक्यांपुढे बेथानी-क्वेरी यांची डाळ न शिजल्याने त्यांना सेट आणि सामनाही गमवावा लागला.(वृत्तसंस्था)माझ्यात लक्ष्य गाठण्याचे धैर्य‘कुठलेही लक्ष्य गाठण्यासाठी आपल्यात क्षमता आणि हिंमतअसायला हवी...’ माझी सहकारी हिंगीसचे हे हे उद्गारआहेत. तिचे उद्गार मी आत्मसात केले. त्यानुसार माझ्यात लक्ष्यप्राप्तीसाठी धैर्य आले आहे. खेळाचे तंत्र आणि प्रतिभा या गुणांसोबतच लक्ष्य गाठण्यासाठी जी हिंमत लागते, ती माझ्यात आहेच. आयुष्यात दृढ संकल्पाशिवाय काही साध्य करता येत नाही, हेच खरे. मार्टिनाकडून अशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.- लिएंडर पेसयूएस ओपनचे मिश्र दुहेरी जेतेपद पटकावल्याबद्दल पेस-हिंगीस यांचे अभिनंदन. आपण ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाचा सन्मान आणि विजयी पताका अशीच उंचावतठेवा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!’’- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपतीपुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खेळ केला. लिएंडर आणि मार्टिना जेतेपदाबद्दल अभिनंदन! आम्ही फार आनंदी आहोत.आपल्या खेळाद्वारे भारताची मान टेनिस जगतात उंचावलीगेली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो.’’- नरेंद्र मोदी, पंतप्रधान लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांचे त्रिवार अभिनंदन! दोघांनी इतिहास रचला. भारतीय क्रीडाक्षेत्राचे वैभव वाढविण्याची धुरा आपल्या खांद्यावर आहे, याचे भान राखून एकापाठोपाठ एक जेतीपदे शिरपेचात रोवल्याबद्दलभारतीयांना अभिमान वाटतो.’’- सर्वानंद सोनोवाल,क्रीडामंत्री