शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: November 18, 2016 00:15 IST

सिंधूनेदेखील आपल्या चाहत्यांना निराश न करता अपेक्षित आगेकूच करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

फुझोउ (चीन) : स्टार शटलर सायना नेहवाल पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर चायना सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांच्या प्रमुख आशा रिओ आॅलिम्पिक रौप्य विजेत्या पी. व्ही. सिंधूवर होत्या. सिंधूनेदेखील आपल्या चाहत्यांना निराश न करता अपेक्षित आगेकूच करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच, पुरुष एकेरी गटात अजय जयरामनेही विजयी कूच करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.सातवे मानांकन लाभलेल्या सिंधूने अमेरिकेच्या बेवेन झांगला तीन गेमपर्यंतच्या लढतीत १८-२१, २२-२०, २१-१७ असे नमवले. झांगने प्रत्येक गुणांसाठी सिंधूला झुंजवले. मात्र, आॅलिम्पिकमध्ये आपल्या झुंजार खेळाच्या जोरावर रौप्य जिंकलेल्या सिंधूने अखेरपर्यंत हार न मानता झांगचे आव्हान परतावले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूपुढे चिनी ड्रॅगनचे आव्हान असून, बिंगजियाओ विरुद्ध तिला दोन हात करावे लागणार आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत सिंधूला बिंगजियाओविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सिंधूकडे आहे. दरम्यान, पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने जबरदस्त झुंजार खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये तिने वेगवान स्मॅशच्या जोरावर ८-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा झांगने पुनरागमन करत तिला गाठले. १६-१६ अशी बरोबरी झाल्यानंतर सिंधूने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये वेगवान स्मॅशसह नेटजवळ मजबूत नियंत्रण मिळवत सामना जिंकला.दुसरीकडे, अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुरुष गटात जयरामने हाँगकाँगच्या वेइ नान याचे कडवे आव्हान २०-२२, २१-१९, २१-१२ असे नमवले. जयरामनेदेखील पहिला गेम गमावून पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणल्यानंतर त्याने निर्णायक तिसऱ्या गेममध्ये तुफान आक्रमण करताना सहजपणे विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यापुढे आॅलिम्पिक चॅम्पियन, दोन वेळचा जागतिक विजेता व आॅल इंग्लंड चॅम्पियन असलेला चीनच्या चेन लोंगचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)