शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करून विश्वचषक स्पर्धेपर्यंत गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 00:18 IST

पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.पनवेल तालुक्यातील देवळोली गावातील देविदास पाटील जन्मापासून अपंग आहे. नोकरी न करता काहीतरी वेगळे करून दाखवायची आवड होती, पण अपंगत्वामुळे अडचण येत होती. १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून फायर अँड सेफ्टीचा डिप्लोमा पूर्ण केला. एके ठिकाणी नोकरीला लागला, मात्र नोकरीत मन लागत नसल्याने तो पॉवर लिफ्टिंग खेळायला लागला. पण यासाठी आहार व इतर गोष्टींवर खर्च जास्त असल्याने हा खेळही सोडून दिला. पायाने अपंग असल्याने गोळाफेक व भालाफेक करणे त्याला जमले नाही. त्याने अपंगांसाठी कोणते खेळ खेळू शकतो याची माहिती इंटरनेटवरून घेतली. त्यावेळी त्याला दिल्लीच्या एका खेळांशी संबंधित संस्थेचा नंबर मिळाला व संंबंधितांच्या सूचनेवरून भोपाळ गाठले. तेथे पोहणे शिकला व वजनही कमी करून कायाकिंग अँड कनोर्इंग खेळात करिअर करण्याचे निश्चित केले.रायगड जिल्ह्यात कुठेही कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) या खेळाचे ट्रेनिंग सेंटर नसल्याने त्याला सांगली गाठावी लागली. त्यानंतर त्याला सांगली येथील कायाकिंग अँड कनोर्इंगचे महाराष्टÑ असोसिएशनचे सेक्रे टरी दत्ता पाटील यांनी मदत केली. देशपातळीवर खेळताना २0१८ मध्ये देविदासला ब्रांझ पदक मिळाले होते. तर फेब्रुवारी २0१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत एका सेकंदासाठी त्याचे सुवर्ण पदक हुकले होते, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. देशपातळीवर खेळताना ज्यांना पदक मिळाले त्यांची निवड पोलंड येथील विश्वचषकासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातून एकमेव देविदास पाटील याची या कायाकिंग अँड कनोर्इंग या खेळासाठी विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेली आहे.अडचणींची मालिका सुरूचविश्वचषकापूर्वी कॅम्पसाठी देविदासला हंगेरी (युरोप) येथे जायचे आहे, मात्र आर्थिक परिस्थितीअभावी त्याचे जाणे रखडले आहे. कॅम्पमधून पोलंडला खेळण्यासाठी रवाना व्हायचे असून त्यासाठी अंदाजे दीड लाख रुपये खर्च येणार आहे. पनवेल व रायगड जिल्ह्याचे नाव उंचावणाºया या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज आहे. परिसरातील विविध संस्था व दानशूर नेत्यांनी त्याला मदत केली तरच तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे.

टॅग्स :panvelपनवेल